सुरेश लोखंडे
ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायत कार्यालये बांधकामांसह ग्रामस्थांच्या जनसुविधेची तब्बल ४१३ कामेयंदा केली जाणार आहे. यावर २७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. शिवाय ७३ अंगणवाडी केंद व त्यांच्या सुशोभीकरणाच्या कामांवरदेखील नऊ कोटी रुपये खर्चाचे नियोजन आहे.
जिल्हा परिषदच्या सर्वसाधारण सभेमध्ये ग्रामपंचायत विभागाने त्यांच्या जनसुविधेच्या कामांचा आढावा सभागृहात मांडला. तर महिला बाल विकास विभागाने त्यांच्या अंगणवाडीकेंद्रांच्या दुरुस्तीसह बांधकामांविषयी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा दीपाली पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी ब. भि. नेमाने यांच्या नियंत्रणात पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत दिली. यावेळी सभागृहात असलेल्या सदस्यांनीदेखील त्यात सहभाग घेऊन दुरुस्त्या सुचवल्या.या कामांमुळे ग्रामीण भागात मोठी विकास कामे होऊन तसेच अंगणवाड्याच्या दुरुस्तीमुळे त्या चकाचक होणार आहेत.ग्रामपंचायतीत होणार ही कामेग्रामपंचायत विभागाच्या नियंत्रणातील कामकाजांतर्गत उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांनी ४१३ जनसुविधेच्या कामांचा आढावा दिला. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या सर्वांगिण उपयुक्त ठरणाऱ्या जनसुविधांची कामे जिल्ह्यात केली जात आहेत. यामध्ये ग्रामपंचायत कार्यालयांच्या बांधकामांसह स्मशानभूमी, दफन भूमी आणि गाव रस्त्यांची कामे हाती घेतली जाणार आहेत. याशिवाय गाव तलावातील गाळ काढणे, सांडपाणी व्यवस्थापनासाठी गटारी, रस्त्यांची दुरुस्ती आदी ग्रामीण जनतेच्या हिताचे ४१३ कामे गावपाड्यांमध्ये केली जात आहे. ३१ मार्च अखेरपर्यंत ही कामे पूर्ण होणार आहेत. याशिवाय पुढील वर्षीदेखील या जनसुविधेच्या विविध कामांवर तब्बल ३५ कोटी रुपये खर्चाचे नियोजन असल्याचे पवार यांनी सांगितले.७३ अंगणवाड्या होणार चकाचकजिल्ह्यातील शाळांप्रमाणेच ग्रामीणभागात अंगणवाडी केंद्रांतही विद्यार्थी संख्या मोठ्याप्रमाणात आहे. या अंगणवाडी केंद्रांमध्ये आल्हाददायक वातावरण करण्याच्या दृष्टीने स्मार्ट अंगणवाडी संकल्पनादेखील जिल्ह्यात राबवण्यात आली आहे. याशिवाय जिल्ह्यातील ७३ अंगणवाडी केंद्रांच्या इमारतींचे बांधकाम व दुरुस्ती, रंगरंगोटीची कामे हाती घेतली आहेत. यातील ४३ अंगणवाडी केंद्रांच्या बांधकामांसह अन्य दुरुस्तीसह तब्बल ७३ अंगणवा्यांची कामे पूर्ण केली जाणार आहेत. यासाठी बांधकामांसाठी सुमारे सात कोटी आणि मानव विकासमधून दोन कोटी अशा नऊ कोटी रुपयांची कामेली जाणार आहेत. या अंगणवाडी केंद्रामधील महिलाना अन्नसुरक्षेच्या दृष्टीने २५ लाख रुपये खर्चुन प्रशिक्षण दिली जात असल्याचे महिला बालकल्याए अधिकारी संतोष भोसले यांनी सभागृहाला सांगितले.