Russia-Ukrain War: रस्त्यावरचा बर्फ वितळवून पाणी पिण्याची वेळ, सुमी शहरात अडकले 900 विद्यार्थी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 09:31 PM2022-03-05T21:31:48+5:302022-03-05T22:03:52+5:30

सुमी हे शहर युक्रेनच्या उत्तर पूर्व भागात असून रशियाच्या बॉर्डरपासून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर आहे.

Russia-Ukrain War: Sumit 900 students get stuck drinking water by melting snow on the road | Russia-Ukrain War: रस्त्यावरचा बर्फ वितळवून पाणी पिण्याची वेळ, सुमी शहरात अडकले 900 विद्यार्थी

Russia-Ukrain War: रस्त्यावरचा बर्फ वितळवून पाणी पिण्याची वेळ, सुमी शहरात अडकले 900 विद्यार्थी

googlenewsNext

ठाणे/अंबरनाथ : युक्रेनच्या सुमी शहरात तब्बल ९०० भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत. या शहरात दर तासाला रशियाकडून बॉम्बहल्ले होत असल्याने विद्यार्थी धास्तावले आहेत. या विद्यार्थ्यांना अन्न तर सोडाच, पण साधं प्यायला पाणीही नसल्याने रस्त्यावर पडलेला बर्फ वितळवून पाणी पिण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यामुळे हे विद्यार्थी अक्षरशः रडकुंडीला आले आहेत. 

सुमी हे शहर युक्रेनच्या उत्तर पूर्व भागात असून रशियाच्या बॉर्डरपासून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर आहे. या शहरातील युनिव्हर्सिटीत शिकण्यासाठी गेलेले तब्बल ९०० भारतीय विद्यार्थी रशिया युक्रेन युद्धामुळे अडकून पडले आहेत. सुमी शहरात सध्या दर तासाला बॉम्ब हल्ले होत असून त्यामुळे विदयार्थी राहत असलेल्या हॉस्टेलमध्ये वीज, अन्न, पाणी याचा पुरवठा बंद झाला आहे. मुरबाड तालुक्यातील एका विद्यार्थ्याने व्हिडीओ तयार करून पाठवला असून त्यात हे विद्यार्थी अक्षरशः रडकुंडीला आल्याचे पाहायला मिळत आहे. 

आम्ही ९०० विद्यार्थी इथं अडकलो असून आम्हाला बाहेर पडण्याचीही सोया नाही. प्रत्येक ठिकाणी स्नायपर्स तैनात असून यापूर्वी बाहेर पडलेल्या काही परदेशी विद्यार्थ्यांना गोळ्या घालण्यात आल्या आहेत. आम्हाला खायला प्यायलाही काहीच उरलेले नाही. आम्ही गुरुवारी दुपारी शेवटचे जेवलो, दुपारचेच उरलेले थोडंसे अन्न रात्रीही खाल्ल, पण आता आमच्याकडे खायला काहीच नाहीये, त्यामुळे आम्ही उपाशी आहोत. प्यायला, टॉयलेटला सुद्धा पाणी नाहीये, त्यामुळे अक्षरशः रस्त्यावर पडलेला बर्फ जमा करून तो वितळवून पाणी पिण्याची वेळ आमच्यावर आली असल्याचे मुरबडचा विद्यार्थी शुभम म्हाडसे याने सांगितले. 

सुमी शहरापासून रशियाची बॉर्डर ही अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर आहे. मात्र भारताचे रेस्क्यू ऑपरेशन हंगेरी, रोमानिया या बाजूने सुरू असून तिथे आम्ही जाऊच शकत नाही, कारण तिथे जायला किमान १२ तासांचा प्रवास करावा लागणार असून त्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याचे हे विद्यार्थी सांगतात. त्यामुळे सुमी शहरात अडकलेल्या या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे शुभमने सांगितले. 
 

Web Title: Russia-Ukrain War: Sumit 900 students get stuck drinking water by melting snow on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.