उल्हासनगर : महापालिका विभागात उडालेला गोंधळ, ठप्प पडलेली विकासकामे, सत्ताधाऱ्यांची एकाधिकारशाही आदींमुळे शहर दहा वर्ष मागे गेल्याचा आरोप पीआरपीचे गटनेते प्रमोद टाले यांनी करत शहरहितासाठी महापालिका बरखास्त करण्याची मागणी केली.शहरातील विकासकामात अनियमितता असून मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप टाले यांनी केला. ठप्प पडलेले अंबरनाथ-कल्याण रस्त्याच्या पुनर्बांधणीचे काम, १७९ कोटीच्या भुयारी गटार योजना, २७० कोटीची पाणीपुरवठा योजना, ३७ कोटीची खेमानी नाला योजना, कचरा उचलण्याचे कंत्राट, रस्त्याची योजना, गलिच्छ व दलित वस्ती विकासाचा निधी, शिक्षण मंडळातील वादात सापडलेले कामे आदींमुळे महापालिका कारभारा बाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले. आयुक्त गणेश पाटील याबाबत स्पष्टीकरणा देत नसल्याने संशय वाढल्याचे ते म्हणाले.महापालिकेवर भाजपा-ओमी टीम व साइच्या महाआघाडीची सत्ता असून त्यांच्या दीड वर्षाच्या सत्तेच्या काळात शहरविकास ठप्प पडला. एकाधिकारशाहीप्रमाणे वागणारा भाजपा पालिकेत प्रतिनियुक्तीवर अधिकारी आणू शकत नाही.
'उल्हासनगर पालिका बरखास्त करा'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 4:41 AM