मीरा रोड : प्रभाग १५ मधील पालिकेच्या सातकरी तलावाची सुरक्षा वाºयावर आहे. या तलावात लहान मुलांसह मोठी माणसेही तलावात उतरत असल्याने दुर्घटना होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याकडे महापालिका व स्थानिक नगरसेवकांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.
महापालिकेचे हे तलाव पावसामुळे पूर्ण भरले आहे. पायऱ्यांपर्यंत पाणी लागले असून तलाव परिसरात पालिकेतर्फे सुरक्षेसंबंधी कोणत्याच उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत जीवाची पर्वा न करता बिनधास्त या तलावात उतरतात. तलावाच्या पायºया, कठड्यांवर बसून मौजमजा करतात. हा तलाव खोल असून पायरीवरून पाय घसरून किंवा कठड्यावरून पडून कुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न सध्या नागरिक विचारत आहेत. तलाव परिसरात कुणी बुडत असल्यास त्याला वाचवण्यासाठी जीवरक्षक किंवा अन्य कोणतीही व्यवस्था नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पाण्यात उतरण्यापासून रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनाही नाहीत. पावसात येथे गर्दी होत आहे.भाजपचे मोहन म्हात्रे, वीणा भोईर, सुरेखा सोनार तर शिवसेनेचे कमलेश भोईर हे चार नगरसेवक या प्रभागाचे प्रतिनिधित्व करतात. वीणा भोईर या प्रभाग समितीच्या सभापती आहेत. तर सोनार पाणीपुरवठा समितीच्या उपसभापती आहेत.सातकरी तलावाच्या देखभाल दुरुस्ती आणि सुरक्षिततेबाबत आपण प्रशासनास अनेक वेळा निर्देश दिले आहेत. मुळात त्यांची नियमित देखरेख करण्याची जबाबदारी आहे. आयुक्तांनीच ही बाब गांभीर्याने घेऊन बेजबाबदार कर्मचाºयांना समज दिली पाहिजे.- वीणा भोईर,सभापती, प्रभाग समिती