ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरी भागातील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी जिल्ह्यामधील शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी गांभीर्याने घेणे अपेक्षित आहे. त्यासाठी त्यांना वाहतुकीचे धडे दिले जात आहे. या करीता ३० व्या राष्ट्रीय सुरक्षा रस्ता अभियानाव्दारे कार्यशाळाचे आयोजन डॉ. काशिनाथ घाणेकर सभागृहात १२ फेब्रुवारी रोजी केले. या कार्यशाळेस जातीने उपस्थित न रहिल्यास कारणे दाखवा नोटीसला शाळाना तोंड द्यावे लागणार आहेत.जिल्ह्यात ३० वे राष्ट्रीय सुरक्षा रस्ता अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांची धोकादाय पध्दतीने वाहतूक केली जात असल्याची गंभीरबाब निदर्शनात आली आहे. यास वेळीच आळा घालून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांची वाहतूक होणे अपेक्षित आहे. यासाठी पालकांमध्ये व जनमानसात जनजागृती करण्याची देखील गरज लक्षात घेऊन शाळेच्या मुख्याध्यापक व प्राचार्याने त्याचे सखोल मार्गदर्शन आणि वाहतूक नियमांची जाणीव करून देण्यासाठी ही कार्यशाळा पार पडत आहे.शालेय विद्यार्थ्यांची स्कूल बसमधून सुरक्षित वाहतूक व स्कूल बस सुरक्षितता अधिनियम २०११मधील तरतुदीबाबत या कार्यशाळेत चर्चा होणार आहे. यासाठी ठाणे जिल्ह्यातील शहरांमधील आणि ग्रामीण भागातील शाळांचे मुख्याध्यापक यांना या कार्यशाळेत निमंत्रित केले असल्याची माहिती शिक्षणाधिकारी माध्यामिक शेषराव बढे यांनी दिली. तसेच या कार्यशाळेस मुख्यध्यापक व प्राचार्य यांनी स्वत: उपस्थित राहावे. तसेच विना परवानगी या कार्यशाळेस अनुपहस्थत राहिल्यास शाळेला कारणे दाखवा नोटीसला तोंड द्यावे लागणार आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठाणे जिल्ह्यातील मुख्यध्यापकानाही आता वाहतुकीचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 8:51 PM
जिल्ह्यात ३० वे राष्ट्रीय सुरक्षा रस्ता अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांची धोकादाय पध्दतीने वाहतूक केली जात असल्याची गंभीरबाब निदर्शनात आली आहे. यास वेळीच आळा घालून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांची वाहतूक होणे अपेक्षित आहे. यासाठी पालकांमध्ये व जनमानसात जनजागृती करण्याची देखील गरज लक्षात घेऊन शाळेच्या मुख्याध्यापक व प्राचार्याने त्याचे सखोल मार्गदर्शन
ठळक मुद्देशालेय विद्यार्थ्यांची धोकादाय पध्दतीने वाहतूक केली जात असल्याची गंभीरबाबविद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांची वाहतूक होणे अपेक्षित शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी गांभीर्याने घेणे अपेक्षित