लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मराठा क्रांती मोर्चासाठी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. मोर्चेकºयांच्या स्वागताच्या कमानी, झेंडे, फ्लेक्स यामुळे शहरातील प्रमुख रस्ते भगवे झाले आहेत. मुंबई आणि परिसरातील कार्यकर्त्यांनी शक्यतो लोकलने प्रवास करून मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.राज्यातून येणारे मोर्चेकरी आणि शहापूर, मुरबाडसारख्या तालुक्यातील कार्यकर्त्यांसाठी ठिकठिकाणी पार्किंग, चहा-नाश्ता, पाणी, वैद्यकीय मदत अशी व्यवस्था संध्याकाळपासूनच सज्ज ठेवण्यात आली आहे.मोर्चाला होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबईपासून १०० किलोमीटरच्या परिघात राहणाºया नागरिकांनी मोर्चाच्या दिवशी सकाळी निघावे, मुंबईत दाखल होण्यासाठी निश्चित करून दिलेली ठराविक वेळ पाळावी, त्याचबरोबर गाड्या आणण्यापेक्षा शक्यतो लोकलने प्रवास करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.मुरबाड, शहापूर येथील कार्यकर्त्यांनी आपली वाहने कल्याण परिसरात पार्क करून पुढील प्रवास लोकलने करावा. तसेच वाहने घेऊन येणाºयांनी मुलुंडपासून दिशादर्शक फलकांचा आधार घ्यावा, पार्किंगची व्यवस्था पाळावी, असे निरोप देण्यात आले आहेत. बुधवारी सकाळी ठाणे शहरातील कार्यकर्ते निघतील. त्यानंतर प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांना वेळा ठरवून दिल्या आहेत.कल्याण-डोंबिवलीही सज्जकल्याण : मराठा मूक मोर्चासाठी कल्याण- डोंबिवलीही सज्ज झाली असून कल्याणहून प्रचंड प्रमाणात समाज बांधव सहभागी होतील, असे आयोजकांनी सांगितले. डोंबिवलीतूनही मोठया प्रमाणावर कार्यकर्ते मोर्चात सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहेत. मराठवाड्यातील ५०० मोर्चेकरी डोंबिवलीत दाखल झाले आहेत.मूक मोर्चानिमित्ताने मंगळवारी सायंकाळी डोंबिवलीतील इंदिरा गांधी चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ््याजवळ सदस्य नोंदणी अभियान पार पडले. बाहेरगावाहून मुंबईत दाखल होणाºयांसाठी कल्याण रेल्वे स्थानकात बुधवारी सकाळी अल्पोपहार आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवारी डोंबिवलीत मराठवाडा परिसरातून ५०० च्या आसपास कार्यकर्ते दाखल झाले असून त्यांची राहण्याची सोय पूर्वेकडील के. बी. विरा हायस्कूल आणि पश्चिमेकडील स. है. जोंधळे हायस्कुलमध्ये करण्यात आली आहे. पुणे, विदर्भातूनही मराठा बांधव दाखल झाल्याची माहिती आयोजकांनी दिली.मोर्चाच्या मार्गावर होणारी वाहतुक कोंडी लक्षात घेऊन बहुतांश कार्यकर्ते रेल्वेने भायखळ््याच्या जिजामात उद्यानाच्या परिसरात दाखल होणार आहेत.कल्याणमधील अनेक कार्यकर्ते मंगळवारी रात्रीच मोर्चाच्या ठिकाणी रवाना झाले आहेत. या मोर्चाची माहिती देत तरूणांनी सोशल मीडियावर एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. मोर्चानिमित्ताने शहरातील मुख्य चौकांमध्ये आवाहनाचे फलकही लावण्यात आले आहेत.50,000 जणांची जेवणाची व्यवस्था कोपरी आनंदनगर जकात नाका येथे सुमारे ५० हजार जणांसाठी चहा-नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर १०० मोबाईल टॉयलेटही उभारण्यात आली आहेत.
ठाण्यातही भगवे वादळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 6:31 AM