डोंबिवली - स्वागतयात्रेच्या निमित्ताने घेण्यात येणाऱ्या विविध सांस्कृतिक उपक्रमांचा शुभारंभ श्री गणेश आवर्तन, सहस्त्रावर्तन सोहळ्याने रविवारी शुभारंभ झाला. त्या सोहळ्याला शेकडो शालेय विद्यार्थी आणि महिला वर्ग उपस्थित होता. मंदिरासमोरील हमरस्त्यावर हा उपक्रम सकाळी 6।30 वाजता संपन्न झाला. मंदिराचे पुजारी मंदार शुक्ल यांनी सहस्रवर्तनाला सुरुवात केली. त्यावेळी समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधी म्हणून सुरेश चव्हाण, हेमंत अहिर, सत्यनारायण माहेश्ववरी, अमित जगताप आदी यजमान म्हणून उपस्थित होते. यापैकी चव्हाण आणि अहिर दाम्पत्य हे केडीएमिसच्या स्वच्छता विभागात कार्यरत आहेत. त्यांना ब्राह्मणवृंदाने मार्गदर्शन केले. त्यावेळी राष्ट्रीय शिक्षण संस्थेचा स्वामी विवेकानंद शाळा आणि अन्य शाळांच्या विद्यार्थ्यांनी गणपती अथर्वशीर्ष पठण केले. त्यानंतर सर्व उपस्थितांनी सामूहिक गणेश सहस्त्र नामावली पठण केले. त्यावेळी संस्थानाचे विश्वस्त अच्युत कऱ्हाडकर, प्रवीण दुधे, मंदार हळबे, सुहास आंबेकर, संजय कानिटकर यांच्यासह यात्रा संयोजन समितीचे संयोजक सूर्यकांत गाणार, भूषण धर्माधिकारी, रवींद्र जोशी, राहुल गोगटे, अनिकेत घमंडी, आणि अन्य समिती पदाधिकारी, श्रुती जोशी, रुपाली साखरे, रजनी येवले सुप्रिया चव्हाण आदींसह महिला सदस्य उपस्थित होते. मंदिराच्यावतीने उपाध्यक्षा अलका मुतालिक यांनी उपस्थितांना पुढील आठवडाभर गुढीपाडव्यापर्यंत होणाऱ्या सांस्कृतिक उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर सामूहिक आरतीने या सोहळ्याची सकाळी 9 वाजता सांगता झाली.
स्वागतयात्रेच्या निमित्त सहस्त्रावर्तनला शेकडो डोंबिवलीकरांची उपस्थिती 200 विद्यार्थ्यांचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 10:25 AM