- सदानंद नाईक
उल्हासनगर : शिवसेनेचे श्रेय घेण्यासाठी कोविड साई प्लॅटीनियम रूग्णालया विरोधात विरोधकानी बागुलबुवा रंगविण्याचा आरोप महापौर लीलाबाई अशान यांनी केला. ऐण कोरोना महामारीत साई प्लॉटिनियम एकमेव कोविड रुग्णालय उभे राहिल्याने असंख्य जणाचा जीव वाचविल्यांची माहिती शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली आहे.
उल्हासनगरात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असताना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने कोरोना रुग्णासाठी शहरात एकमेव कोविड साई प्लॅटनियम रुग्णालय उभारण्यात आले. रुग्णालयातील सर्वच बेड ऑक्सीजन युक्त करण्यासाठी महापालिकेने १८ लाख खर्च केल्याची कबुली रुग्णालय प्रशासनाने दिली. दरम्यान महात्मा फुले जनआरोग्य योजना राबविण्या वरून वाद निर्माण झाला. सुरवातीला मनसे यांनी रुग्णालय विरोधात आवाज उठविल्यानंतर आता भाजपही विरोधात उभी ठाकली. कोरोना संशयित व कोरोना रुग्णावर उपचार करण्यास खाजगी रुग्णालय भित होते. अशावेळी साई प्लॅटनियम रुग्णालय, कोरोना रुग्णांना सेवा देण्यासाठी पुढे आल्याची माहिती रुग्णालयाचे डॉ पॉल यांनी दिली. गेल्या दोन अद्दिच महिन्यात ७०० पेक्षा जास्त कोरोना रुग्णावर उपचार केले असून ते ठणठणीत घरी गेल्याचेही डॉ पॉल यांचे म्हणणे आहे. रूग्णालयात ६५ आयसीयू बेड असून त्यापैकी ४५ व्हेंटिलेटर सज्ज बेड आहेत.
साई प्लॅटनियम रूग्णालयात कोरोना चाचणी लॅब असून कोरोना रुग्ण सोबत इतर रुग्णावर उपचार करून शस्त्रक्रिया केली जाते. इतर शासकीय व खाजगी लॅब मध्ये नाक व घस्यातून स्वाब घेतला जातो. मात्र आम्ही फफुसात नळी घालून स्वाब घेतो. त्यामुळे निश्चित निदान होत असल्याचे डॉ पॉल यांचे म्हणणे आहे. गोर गरीब व गरजू नागरिकांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना राबविण्याचा प्रयत्न केला. मात्र राजकीय राजकारण त्याला आड आल्याने तूर्तास योजना स्थगित ठेवली. असे असलीतरी महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू करण्याचे संकेत डॉ पॉल यांनी दिले. तर दुसरीकडे भाजप व मनसेने रुग्णालयाच्या प्रशासन व कार्यपद्धतीवर आरोप करून कारवाईची मागणी केली आहे.
साई प्लॅटनियम रुग्णालयामुळे कोरोना रुग्णांना दिलासा-
शहरात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असताना, साई प्लॅटनियम रुग्णालयाने महत्त्वपूर्ण भूमिका वठविली. त्यामूळे शेकडो रुग्णांना दिलासा मिळून असंख्य जनाचे जीव वाचल्याची माहिती महापौर लीलाबाई अशान यांनी दिली. तर शिवसेनेचे श्रेय लाटण्यासाठी विरोधी पक्ष वंगाळ राजकारण करीत असल्याचा आरोप शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केला आहे.