ठाणे : २00२-0३च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी साकीब नाचन याची बुधवारी ठाणे कारागृहातून सुटका करण्यात आली. दहा वर्षे कारावासाची शिक्षा झालेल्या साकीबचे तुरूंगातील चांगले वर्तन विचारात घेऊन जवळपास पाच महिने आधी त्याला मुक्त करण्यात आले.डिसेंबर २00२ ते मार्च २00३ या काळात १३ लोकांचा बळी घेणाºया मुंबई सेंट्रल, विलेपार्ले आणि मुलुंड येथील तीन बॉम्बस्फोटांमध्ये विशेष पोटा न्यायालयाने १0 आरोपींना शिक्षा ठोठावली होती. त्यात वाणिज्य शाखेचा पदवीधर असलेल्या साकीबचाही समावेश होता. तो ठाणे जिल्ह्यातील पडघा येथील असून, वादग्रस्त सिमी संघटनेचा महासचिव होता. ५७ वर्षीय साकीब ठाणे कारागृहातील अंडा सेलमध्ये होता. एप्रिल २0१६ मध्ये त्याला दहा वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. खटल्याच्या काळातही तो तुरूंगातच असल्याने तेवढी वर्षे शिक्षेतून वगळण्यात आली होती.बॉम्बस्फोटाच्या तपासादरम्यान पडघा येथील काही उच्चशिक्षित तरूणांचीही चौकशी करण्यात आली होती. साकीब तुरूंगात जास्त कुणाशी बोलत नव्हता. तुरूंगात तो अतिशय शांत आणि अलिप्त राहत असे, असे तुरूंग अधिकाºयांनी सांगितले. साकीबला वाचनाची आवड आहे. तुरूंगात त्याने कायद्याचा अभ्यास केला. न्यायालयात त्याची बाजू तो स्वत:च मांडत होता. साकीबची पाच महिने १३ दिवस आधी सुटका करण्यात आली असल्याचे तुरुंग अधीक्षक नितीन वायचळ यांनी सांगितले.>नियमित प्रक्रियेचा भागचांगल्या वर्तणुकीच्या आधारावर सर्वच कैद्यांची लवकर सुटका होते. तुरूंगात वर्तन चांगले असेल तर प्रत्येक कैद्याच्या शिक्षेतून वर्षाचे ठराविक दिवस वगळले जातात. सरते शेवटी या वगळलेल्या दिवसांची गोळा बेरीज करून कैद्याची लवकर सुटका केली जाते. साकीबची सुटका याच प्रक्रियेचा भाग असल्याचे तुरूंग अधिकाºयांनी सांगितले.पार्श्वभूमीडिसेंबर २00२ ते मार्च २00३ या काळात झालेल्या तीन बॉम्बस्फोटांमध्ये १३ जणांचा मृत्यू, तर १४७ जण जखमी झाले होते.६ डिसेंबर २00२ रोजी पहिला बॉम्बस्फोट मुंबई सेंट्रल येथील मॅकडोनाल्ड रेस्टॉरंटमध्ये झाला होता. त्यादिवशी अयोध्या येथील बाबरी मशिद उद््ध्वस्त करण्याच्या घटनेला १0 वर्षे पूर्ण झाली होती. या घातपातामध्ये २७ जण जखमी झाले होते.२७ जानेवारी २00३ रोजी विलेपार्ले रेल्वे स्थानकाबाहेर एका सायकलवर बॉम्बस्फोट घडविण्यात आला होता. यामध्ये एका महिलेचा मृत्यू तर ३२ जण जखमी झाले होते. यादिवशी गोधरा हत्याकांडाला एक वर्ष पूर्ण झाले होते.१३ मार्च २00३ रोजी सीएसटी येथून कर्जतला जाणाºया लोकलमध्ये स्फोट घडविण्यात आला होता. यामध्ये १२ जणांचा मृत्यू तर ९0 पेक्षा जास्त लोक जखमी झाले.
साकीब नाचन तुरुंगाबाहेर, पाच महिने आधी सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 06:03 IST