कुमार बडदे मुंब्रा : इशरत जहाँपासून ते मुदब्बीर रहेमान या ‘इसीस’च्या कथित हस्तकांमुळे बदनाम झालेल्या व जणू अतिरेकी कारवायांचा अड्डा असल्याचा संभ्रम निर्माण केला गेलेल्या मुंब्य्रात गेल्या चार दिवसांपासून उर्दू भाषेतील पुस्तकांचा मेळावा भरला असून त्यात आतापर्यंत ४० लाख पुस्तकांची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे यात मराठी, हिंदी भाषेतील पुस्तकांबरोबरच हिंदूचे धर्मग्रंथ असलेल्या गीता, रामायण यासारख्या धार्मिक ग्रंथाचीही विक्री झाली आहे. उद्या रविवारी प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर हेही मेळाव्यात आपली पायधूळ झाडणार आहेत. पुस्तकांचा हा मेळावा ही देखील मुंब्य्राची ओळख आहे.इंग्रजी भाषेच्या कथित आक्र मणामुळे विविध मातृभाषांप्रमाणेच शेरोशायरीसाठी प्रसिद्ध असणारी मधूर, रसाळ उर्दू भाषादेखील लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. तसे होऊ नये, तिच्यातील माधुर्यासह ती जिवंत राहावी तसेच दैनंदिन व्यवहारातहीतिचे चलनवलन सुरू राहून तिचे आकलन करण्याकडे कल वाढावा, या भाषेतील विविध प्रकारची पुस्तके वाचकांना सहज उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने मुंब्रा उर्दू लिटरली कमिटीने अथक प्रयत्न करून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कौसा भागातील एमएम व्हॅली परिसरातील मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियममध्ये हा उर्दू पुस्तक मेळावा आयोजिला आहे.रविवारी रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणाऱ्या मेळाव्यात पुस्तकविक्र ीसाठी ८३ स्टॉल लावले आहेत. त्यावर ८० लाखांहून अधिक धार्मिक, शैक्षणिक, कथा, कादंबºया तसेच लहान मुलांच्या गोष्टीची पुस्तके विक्र ीसाठी उपलब्ध आहेत. ती खरेदी करण्यासाठी वाचकांची मोठी गर्दी उसळत आहे.राज्यातील औरंगाबाद, मालेगाव, भिवंडी याचप्रमाणे मुंबईतील विविध उपनगरांमधील, तसेच राज्याबाहेरील दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू आदी ठिकाणच्या प्रकाशक तसेच विके्रत्यांनी या मेळाव्यात त्यांची पुस्तके विक्र ीसाठी ठेवली आहेत. येथे उर्दू भाषेप्रमाणेच हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेची पुस्तकेदेखील उपलब्ध आहेत. विविध विषयांवर उपलब्ध असलेल्या तब्बल ८० लाख पुस्तकांमुळे चोखंदळ वाचकांना त्यांच्या आवडीच्या विषयांवरील पुस्तके खरेदी करण्याला मोठा वाव आहे.तज्ज्ञांची व्याख्यानेरु ण पिढीला उर्दू भाषेचे महत्त्व कळावे तसेच इंग्रजी भाषा हीच सर्वस्व नसल्याचे त्यांना आकलन व्हावे. यासाठी उर्दू भाषेतून शिक्षण घेऊन उच्च पदावर पोहोचून उल्लेखनीय कामगिरी केलेल्या आणि करत असलेल्याचे व्याख्यान तसेच चर्चासत्राच्या कार्यक्र म आयोजित करण्यात येत असून, याच अंतर्गत रविवारी सुप्रसिद्ध रचनाकार जावेद अख्तर यांचा कार्यक्र म आयोजित केला आहे. यासाठी मेळाव्याच्या परिसरात भव्य स्टेजची व्यवस्था केली आहे. मागील चार दिवसांत मेळाव्यात तब्बल ४० लाखांहून अधिक पुस्तकांची विक्र ी झाली आहे.तरुण पिढीची आवड ओळखून मेळाव्यात आकर्षक सेल्फी पॉइंटदेखील उभारला आहे. ५०० रुपये त्याहून अधिक रकमेची पुस्तके खरेदी करणाऱ्यांना त्यांनी उर्दू भाषा वाचवण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल प्रशस्तीपत्र देण्यात येत आहे, अशी माहिती कमिटीचे पदाधिकारी मुख्याध्यापक सय्यद जाहिद अली तसेच अहमद इजहार, आदिल खान आजमी, इम्तियाज खलील, अब्दुल मतीन शेखानी, मुख्तार काजी यांनी ‘लोकमत’ला दिली.>उर्दू भाषेतील गीता, रामायण उपलब्धया मेळाव्यात मोहंजोदडोपूर्वीच्या इतिहासाची दुर्मीळ पुस्तके, तसेच इतर धर्मीयांच्या नेहमीच आकर्षणाचा विषय राहिलेल्या कुराणमधील ओळींचा अर्थ, मराठी, तसेच हिंदीमध्ये भाषांतरित केलेली पुस्तके, याचप्रमाणे महाभारत, रामायण, गीता आणि हिंदू धर्मातील इतर धार्मिक ग्रंथांचे उर्दूमध्ये अनुवादित केलेली पुस्तकेदेखील उपलब्ध आहेत.
मुंब्य्रातील मेळाव्यात ४० लाखांच्या पुस्तकांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 1:04 AM