शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

पाच हजार लीटर दुधाची विक्री, दूधनाक्यावर लीटरचा भाव ६५ ते ७० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 1:57 AM

दूधविक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरातील दूधनाक्यावर गुरुवारी कोजागरी पौर्णिमेनिमित्त दररोजपेक्षा दुप्पट म्हणजेच पाच हजार लीटर दुधाची विक्री झाली.

कल्याण : दूधविक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरातील दूधनाक्यावर गुरुवारी कोजागरी पौर्णिमेनिमित्त दररोजपेक्षा दुप्पट म्हणजेच पाच हजार लीटर दुधाची विक्री झाली. दुधाचा भाव हा ६५ ते ७० रुपये इतका होता. तो दररोजच्या दरापेक्षा १५ ते २० रुपयांनी जास्त असूनही ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात दुधाची खरेदी केली.कल्याण पश्चिमेत असलेल्या तबेल्यांतील ताजे दूध या नाक्यावर विकले जाते. या नाक्यावर १०० विक्रेते दुधाचा व्यवसाय करतात. दुधाचा भाव रोजच्या रोज ठरवला जातो. पहाटे ४ वाजल्यापासून या नाक्यावर दूधविक्रीला सुरुवात होते. दररोज दुधाचा भाव हा ५० ते ५५ रुपये लीटर इतका असतो. दररोज अडीच हजार लीटर दुधाची विक्री होते. मात्र, कोजागरीनिमित्त गुरुवारी हा भाव प्रतिलीटर ६५ ते ७० रुपये असतानाही पहाटे ४ ते दुपारी ३ पर्यंत दुप्पट दुधाची विक्री झाली, अशी माहिती दूधविक्रेते मजाज कर्ते, मोहम्मद हनी यांनी दिली.कल्याणमध्ये दैनंदिन दूध घेणारे व हलवाई विविध मिठाई तयार करण्यासाठी दूधनाक्यावर दूध घेतात. कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, मुलुंड, मुंबई परिसरांतून लोक दूधनाक्यावर दूध घेण्यासाठी येतात. या भागातून तेथे दूध पोहोचवले जाते. म्हशीचे ताजे व घट्ट दूध येथे मिळते. त्यामुळे सुट्या दुधाचा भाव जास्त असला तरी ग्राहक येथे दूध विकत घेतात. दरम्यान, कोजागरीनिमित्त रात्री चंद्रप्रकाशात दूध आटवून त्याचा आस्वाद घेण्यात आला. त्यानिमित्ताने विविध सोसायट्यांच्या गच्चीवर व चाळीत विविध कार्यक्रमही रंगले होते.स्पेशल बेंगलोरी फरसाण : आटवलेल्या दुधाबरोबर बेंगलोरी फरसाणावरही खवय्यांनी ताव मारला. हे फरसाण केवळ कोजागरीनिमित्त तयार केले जाते. ते काही ठरावीक फरसाण मार्ट व डेअरीमध्ये मिळते. अंबरनाथमधील डेअरीमालक मीनूभाई हसीजा यांनी सांगितले की, दरवर्षी कोजागरीला आम्ही बेंगलोरी फरसाण तयार करतो. लालभडक फरसाण असते. ते २०० रुपये किलोने विकले जाते. त्यात कच्ची मिरची व कच्चे टोमॅटो सजावटीसाठी ठेवले जातात. त्याला चांगली मागणी असते.

टॅग्स :thaneठाणेFarmerशेतकरी