लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : वर्दीतला अधिकारीदेखील माणूस असतो. त्यालाही त्यांचे छंद, आवडीनिवडी असतात. कामाच्या वेळेत त्याला त्या पूर्ण करता येत नाहीत. मात्र, वर्दीतले असेच कलाकार शोधून त्यांच्या कलागुणांना रविवारी 'लोकमत'ने साहित्य महोत्सवाच्या निमित्ताने वाव देण्याचा प्रयत्न केला. या 'वर्दीतील ददीं'नी गझल, हिंदी- मराठी गाणी गाऊन एकच धम्माल उडवून दिली. वर्दीतील दर्दीची ही सुरेल मैफल ऐकण्यासाठी खरेदीकरिता कोरम मॉलमध्ये आलेल्यांसह रसिकांनी एकच गर्दी केली होती.
जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त २७ फेब्रुवारी रोजी 'लोकमत साहित्य पुरस्कार'चे वितरण ठाणे गडकरी रंगायतन येथे केले जाणार आहे. मराठी भाषेचा जागर घालण्यासाठी तीन दिवसीय 'लोकमत साहित्य महोत्सव'चे आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी 'वर्दीतील ददर्दी' या कार्यक्रमाने दुसरे पुष्प गुंफले गेले. त्याला रसिकांनी भरघोस प्रतिसाद दिला.
ताण वाढतो तेव्हासहायक पोलिस आयुक्त कन्नलू यांनी घरी वेळ मिळेल तशी गाण्याची तयारी केली जाते, असे सांगितले. तर ययाती पाठक यांनी ठरवून गाण्याची प्रक्टिस केली जात नाही, असे सांगितले, गाणे गाण्यामुळे कामाचा ताण कमी होतो. गाणे हा माझा छंद आहे. निवृत्तीनंतर काय करणार तर गायन करा, असा बायकोचा सल्ला मानला, असे पाठक म्हणाले, बायको, मुले आणि मी सुटीच्या दिवशी घरात गाणी गातो, असेही पाठक म्हणाले. साहेबांनी गाणे गुणगुणले तर ते टेन्शनमध्ये आहेत. असे समजावे, असे कन्नलू म्हणाले.• ठाणे महापालिकेचे कर्मचारी गुरुनाथ पाटील यानी तबला वादन केले तर दत्तात्रय मानमोडे यांनी बासरी वादन केले. दोघांनी मिळून कार्यक्रमाच्या सुरुवातीला बंदीश सादर केली. त्यानंतर 'प्रथम तुला वंदितो' या गाण्याची धून सादर केली.
• वर्तकनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप वेडे, जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहायक संदेश म्हस्के, जि. प.चे कनिष्ठ सहायक प्रमोद धनगर, ठाणे महापालिकेचे कर्मचारी शिवराम टक्के यांनी अनेक सुमधूर गीते सादर करून रसिकाची दाद मिळवली.
मॉलमध्ये साहित्य महोत्सव ही वेगळीच संकल्पना'लोकमत'ने मॉलमध्ये साहित्य महोत्सवाचे आयोजन केले ही संकल्पना वेगळी व स्तुत्य आहे. मी प्रदर्शनाला भेट देऊन काही पुस्तके खरेदी केली. ठाणेकर हा चागला वाचक आहे. मराठी भाषा, साहित्यिक, वाचक समृद्ध आहे. मराठी वाचक कमी झालेला नाही. 'वर्दीतल्या दीं या कार्यक्रमाच्या निमित्ताने सरकारी नोकरीतील कलाकारांना वाव देण्याचे काम लोकमत'ने केले. राजकीय लोकांचा परफॉर्मन्स रोजच सुरू असतो. त्यामुळे कदाचित त्यांना या ठिकाणी संधी दिली नाही, चांगले उपक्रम 'लोकमत'च्या माध्यमातून चालतात. मन, बुद्धी आणि शरीर हे समतोल ठेवण्याचे काम लोकमत करीत आहे.- संजय केळकर, भाजप आमदार, ठाणे