शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

कापडनिर्मिती उद्योगांना चालना देण्यासाठी समाजवादी पक्षाच्या आमदारांचे विधिमंडळ प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2021 9:01 PM

textile industry: आर्थिक मंदीमुळे कमी होत चाललेला भिवंडी, मालेगाव आणि इचलकरंजी शहरांतील यंत्रमाग कापड उद्योग आता लॉकडाऊनमूळे डबघाईला आला आहे

- नितिन पंडीतभिवंडी - आर्थिक मंदीमुळे कमी होत चाललेला भिवंडी, मालेगाव आणि इचलकरंजी शहरांतील यंत्रमाग कापड उद्योग आता लॉकडाऊनमूळे डबघाईला आला आहे आणि शासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे त्यांच्यावरील अन्याय दूर व्हावा आणि यंत्रमाग मालक आणि त्यातील कामगारांना दिलासा मिळण्यासाठी विशेष असे राहत पॅकेज देण्यात यावे यासाठी पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि भिवंडी पुर्वचे आमदार रईस शेख यांनी विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर मंगळवारी आंदोलन करीत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. (Samajwadi Party MLAs hold agitation at the entrance of the legislature to give a boost to the textile industry)

भिवंडीतील यंत्रमागाद्वारे कापडनिर्मिती करणारा उदयोग लॉकडाऊनमूळे आणि आर्थिक मंदीमुळे डबघाईला आला आहे त्यामुळे या उद्योगाचे पुनरुज्जीवन करून त्यात स्थिरता आणून यंत्रमाग उद्योग वाढीसाठी योग्य ती कार्यवाही करून संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांच्याकडे जून महिन्यात लेखी निवेदनाद्वारे केली होती. 

 दिवसेंदिवस यार्नचे भाव वाढत आहेत जानेवारी २०२१ मध्ये ६० एस या दर्जाच्या सुताचे दर ९५० रुपये प्रति पाच किलो होते आणि जून महिन्यात त्याचे दर १४५० रुपये प्रति पाच किलो झाले आहेत.त्याचप्रमाणे ९० नंबरचा सुपर फाईन कॉटन यार्न १८५० वरून २५०० रुपये झाला आहे. त्यामुळे त्याद्वारे तयार होणाऱ्या कापडाची किंमत वाढली आहे परंतु किंमत वाढल्याने त्याप्रमाणात त्याचा खप होत नाही आहे. त्याचप्रमाणे यंत्रमागधारक मालकांना शासनाकडून आर्थिक तरदूत करण्यात येऊन लॉक डाऊन काळातील वीज माफ करण्यात यावे अथवा त्यात सवलत मिळावी आणि लॉकडाऊन काळातील बँकेच्या कर्जावरील व्याज माफ करावे आणि त्यात सवलत द्यावी आणि टीयुएफ योजनेअंतर्गत रिपेअर लूम लावलेल्या यंत्रमाग धारकांचे कर्जावरील व्याज माफ करावे तसेच त्यात सवलत देण्यात यावी यासाठी शासन स्तरावर कार्यवाही करण्यात येऊन एवढ्या मोठ्या कापड उद्योग असलेल्या शहरात त्यासाठी मार्केट नाही त्यामुळे याठिकाणी कापड मार्केट तसेच यार्न मार्केट तयार करण्यात यावे, अशा प्रकारच्या मागण्या आ. रईस शेख यांनी वस्त्रोद्योग मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केेल्या होत्या, त्याविषयी कार्यवाही करण्याची मागणी करत शहरातील कापड निर्मिती उद्योगाचे पुनरुज्जीवन करून त्यात स्थिरता येऊन कापड उद्योग वाढीसाठी संबंधित सर्व अधिकाऱ्यांसोबत एका संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी केली होती. परंतु त्यावर कोणतीच कार्यवाही न झाल्याने आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आंदोलन करण्यात आले.

टॅग्स :Textile Industryवस्त्रोद्योगSamajwadi Partyसमाजवादी पार्टीMaharashtraमहाराष्ट्र