- शाम धुमाळ
कसारा- सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास मुंबई नागपूर समृद्धी महामार्गांच्या पॅकेज 16 चे काम सुरु असताना शहापूर तालुक्यातील सरळाबे कासगाव गावाच्या लगत सुरु असलेल्या पुलाच्या कामा वेळी सुमारे दीडशे फूट उंचा वरून सिमेंट चे गर्डर,लोखडी सेफ़टी लॉचर व क्रेन कोसळून भीषण आपघात झाला. या अपघातात अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला तर काहींना अपंगत्व आले.
सोमवारी रात्री 1च्या सुमारास आम्ही घटनास्थळ पोहचलो. रात्रीच्या अंधारात कोसळलेल्या सिमेंट व लोखडाच्या महाकाय सांगड्या खाली व वर काही मृतदेह पडलेले दिसून आले. तर त्या पडलेल्या ढिगाऱ्याखाली जीवाच्या आकांताने वाचवा वाचवाची आरोळी देणारे एक दोन आवाज येऊ लागले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी जमा झालेले. ग्रामस्थ,पोलीस ,महसूल कर्मचारी ,शहापुरातील काही मंडळी व आपत्ती व्यवस्थापन टीम कसारा या व्हाटसअप ग्रुपची मंडळी मदत कार्यासाठी पुढे सरसावली मदतीसाठी पुढे आलेल्यातहसीलदार कोमल ठाकूर,उपविहागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे पोलीस कर्मचारी, महसूल कर्मचारी यांचे सहआपत्ती व्यवस्थापनचे शाम धुमाळ,मनोज मोरे,विनंद आयरे, प्रसाद दोरे सुनील करावर,रुपेश भवारी, गणेश शिंदे फाययाज शेख,प्रकाश गायकर, यांच्या सह उपजिल्हाधिकारी रेवती गायकर ,प्रांताधिकारी सानप यांच्यासह, शेकडो हातांनी पाऊस,चिखल, गाळ,अंधार याची पर्वा न करता मदत कार्य सुरु केले गर्डर व लॉचरच्या वर जे पडलेले जखमी व मयत होते त्यांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु केली.
मोबाईलच्या बॅटरी सह सोबत नेलेल्या बॅटरी च्या च्या मदतीने सर्च करून 3 जखमी व 5 मृतदेह बाहेर काढण्यात सर्वांना यश आले मदतीसाठी आलेल्या सर्वांनी आपली सुरक्षितता बाळगून मदत कार्य सुरु ठेवले रात्री 4 पर्यत 12 मृतदेह शहापूर ग्रामीण रुग्णाल्यात पाठवण्यात आली परंतु नंतर मदत कार्य करताना अनंत अडचणी निर्माण झाल्या .कारण पुढील मदत कार्य साठी महाकाय क्रेन, जेसीबीची गरज लागणार होती. एवढ्या पहाटे 3 च्या सुमारास कंपनी ने क्रेन,गॅस कटर च्या साह्याने लोखडी पाईप कापण्यास सुरुवात केली तर मोठ मोठे जनरेटर लावून लाईट व्यवस्था सुरु केली.साध्या क्रेन ने काही साद्य होत नसल्याने प्रयत्नांती काही वेळाने महाकाय क्रेन मागवण्यात आले ते क्रेन आल्या नंतर मदत कार्याला मोकळी वाट भेटत गेली परिस्तिथी चे गांभीर्य लक्षात घेत ठाण्याहून एन डी एफ चे पथक सकाळी दाखल झाले त्यांनी उर्वरित मृतदेह क्रेन च्या मदतीने बाहेर काढून प्रशासनाच्या तब्यात दिले.मात्र.या दुर्दैवी घटने साठी मदती चा हाथ पुढे करीत बचाव कार्य करणाऱ्या सर्वांच्या डोळ्या तील अश्रू वाट मोकळी करीत होते. त्यातच या अपघतात थोडक्यात जखमी असलेल्या प्रेम प्रकाश या तरुणा ने धसका घेतल्याने त्याची अवस्था मनाला चटका लावून जात होती.