शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
3
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
4
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
5
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
6
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
7
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
8
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
9
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
10
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
11
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

अजेय संस्था आयोजित "अभयारण्य - चला निसर्ग होऊ या " स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 4:50 AM

ठाणे : अजेय संस्था '' अभयारण्य - चला निसर्ग होऊ या '' ही स्पर्धा सध्या घेत आहे. प्रत्येक माणसाला ...

ठाणे : अजेय संस्था '' अभयारण्य - चला निसर्ग होऊ या '' ही स्पर्धा सध्या घेत आहे. प्रत्येक माणसाला लहानपणापासून जंगलांची प्राण्यांची ओढ असते, सुप्त आकर्षण असते. जसजसे मोठे होत जातो तसे हे आकर्षण बाजूला पडते. प्राण्यांच्या प्रजाती, त्यांची जात जिवंत असण्याची नैसर्गिक गरज, भूतदया या गोष्टींकडे दुर्लक्ष होत जाते. या सगळ्या गोष्टींबद्दलची जागरूकता पुन्हा एकदा तयार व्हावी आणि अभयारण्यांच्या जगात पुन्हा एकदा जाऊन जगता यावे, अभयारण्यातले घटक माणसाबद्दल काय विचार करत असतील याचा लेखनातून आणि सादरीकरणातून शोध घेता यावा, यासाठी अभयारण्य स्पर्धा सुरू झाली.

लेखक दिग्दर्शक डॉ. क्षितिज कुलकर्णी यांची ही संकल्पना असून गौरव संभूस निर्माता आहे. ह्या स्पर्धेचे नियोजन म्हणजेच फॉरेस्ट ऑफिसर्स कार्तिक हजारे, पल्लवी गोडबोले आचार्य, विदुला खेडकर,नलिनी पुणेरी हे करणार आहेत. यात एकूण ३५ स्पर्धकांनी सहभाग घेतला असून सहभागी स्पर्धकांनी अभयारण्यातील एक घटक निवडला आहे. उदा. प्राणी, पक्षी, नदी, डोंगर, झाडे. १४ एप्रिल आणि २१ एप्रिलला अजेय संस्थेच्या शतकोटी रसिक समूहावर दोन प्रश्न आले. या प्रश्नांवर निवडलेला घटक बनून त्याच्या दृष्टिकोनातून प्रश्नांची उत्तरे स्पर्धक देत आहेत. २५ एप्रिलला अभयारण्याची प्राथमिक फेरी शतकोटी रसिक व्हाॅट्सॲप् समूहावर संध्याकाळी ५ ते ९ या वेळात पार पडली. अभयारण्याची अंतिम फेरी १ मे रोजी फेसबुकच्या झपुर्झा पेजवर लाईव्ह होणार आहे. या स्पर्धेत २५ एप्रिलला प्राणी मित्र भूपेन कुळकर्णी ह्याने प्रेक्षकांशी पक्षी सृष्टीवर संवाद साधला आणि १ मे रोजी काही प्राणीमित्र प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. प्रथमेश जोशी, ओंकार कदम, श्वेता कोहोजकर हे तीन प्राणी मित्र पाहुणे कार्यक्रमाला लाभले आहेत.

हा कार्यक्रम विनामूल्य आहे.

पेज लिंक - http://Fb.me/zapurza2021