शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
4
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
5
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
6
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
7
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
8
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
9
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
10
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
11
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
12
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
13
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
14
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
16
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
17
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
18
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
19
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
20
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

रेती-भूमाफियांमुळे कांदळवन संकटात; बाळकुम ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारवजा मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2019 3:23 AM

जिल्ह्यात नवी मुंबई, ठाणे, घोडबंदर, नागलाबंदर, मीरा-भार्इंदर, भिवंडी, दिवा, कळवा, मुंब्रा येथील खाडीकिनारी एक हजार ६०८ हेक्टरवर कांदळवन आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : समुद्रात होणारे चक्रीवादळ, त्यामुळे उठणाºया लाटा या नैसर्गिक संकटासह दिवा खाडीसह घोडबंदर, नागलाबंदर, मुंब्रा खाडी, बाळकुम, साकेत परिसरात रेती आणि भूमाफियांमुळे जिल्ह्यातील कांदळवने संकटात आली आहेत. बाळकुम येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून या संकटाची जाणीव करून कांदळवन वाचवण्याची मागणी केली आहे.जिल्ह्यात नवी मुंबई, ठाणे, घोडबंदर, नागलाबंदर, मीरा-भार्इंदर, भिवंडी, दिवा, कळवा, मुंब्रा येथील खाडीकिनारी एक हजार ६०८ हेक्टरवर कांदळवन आहे. यात मुंब्रा, दिवा खाडीतील कांदळवन नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर आहे. रेतीउत्खननासाठी मुंब्रा, दिवा, नागलाबंदर आणि घोडबंदर परिसरात त्याचा नाश होताना दिसून येत आहे.जिल्ह्यात ठिकठिकाणी तिवरांच्या झाडांची कत्तल झाल्याचे आढळून येत आहे. बहुतांश ठिकाणी नष्ट होत असलेल्यांपैकी काही कांदळवने तग धरून आहेत. काही ठिकाणी लक्ष केंद्रित करून ७२ जणांवर वर्षभरापूर्वी फौजदारी गुन्हे दाखल केल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सक्त ताकीद दिल्यामुळे जिल्ह्यात या कांदळवनाची वाढ होऊन ते बहरणार असल्याची अपेक्षा होती. मात्र, ठिकठिकाणच्या खाडीकिनारी भराव टाकून तिवरांची, खारफुटीची झुडुपे दाबली जात असल्याची तक्रार नुकतीच बाळकुमच्या ग्रामस्थांनी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.दरम्यान आलेले महाचक्रीवादळ तिवरांची झाडे, कांदळवनाच्या अडथळ्यामुळे अन्यत्र न पसरता सरळ पुढे गुजरातच्या दिशेने समुद्रातून पुढे गेले. यावरून सागरी संकटापासून कांदळवन, तिवरांच्या झाडांमुळे बचाव होत असल्याचे पुन्हा दिसून आल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.रेतीच्या हव्यासापोटी माफियांनी ठिकठिकाणचे कांदळवन नष्ट करून मनसोक्त तिचे उत्खनन केल्यामुळे दिवा खाडीसह, मुंब्रा, कोपर, कळवा आदी खाडीकिनारे ओस पडले. यामुळे या खाडीचे पाणी रेल्वेरुळांपर्यंत पोहोचण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्णातील खाडीकिनारी दोन हजार हेक्टरपेक्षा क्षेत्रावर कांदळवन, तिवरांची झाडे आहेत. पण, रेती काढण्यासाठी अडथळा ठरणाºया या तिवरांच्या झाडांसह कांदळवनाच्या बुंध्याशी केमिकल्स टाकून ते नष्ट करण्याचे प्रयत्नही याआधी झाले. यामुळे काही ठिकाणचे खाडीकिनारे पूर्णपणे ओसाड झाले. त्यावर भरतीचे पाणी शिरून या मोकळ्या ठिकाणी गाळ साचला. या गाळातूनही नष्ट केलेले तिवरांच्या झाडांचे बुंधे अस्तित्वाची जाणीव करून देताना दिसत आहेत. प्रशासनाकडे सुमारे एक हजार ६०८ हेक्टर क्षेत्रावरील कांदळवनाची नोंद आढळते. पण, सुमारे दोन हजार हेक्टरपेक्षा जास्त कांदळवन, तिवरांचे क्षेत्र असल्याचे जाणकारांकडून कळते.कांदळवनाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आधीच कांदळवन किंवा पाणथळ जागेचा नाश करणाºया सुमारे ६० जणांवर तत्कालीन ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी गुन्हे दाखल केले. यामध्ये गुन्हे नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, मीरा-भार्इंदर या भागातील कांदळवन व जागा नाश करणाºयांचा समावेश आहे. तर, कनकियानगर, तिवारी कॉलेज रोड, शिवनेरीनगर या परिसराला भेट देऊन भराव टाकून कांदळवन नष्ट करणाºयांवर १२ गुन्हे तत्कालीच दाखल केल्याचा दावा आहे.भिवंडी तालुक्यातील शासकीय जमिनीवरील कांदळवन व्याप्ती सुमारे १३७ हेक्टरची आहे. वनसंरक्षित (अधिसूचित) करण्यासाठी प्रस्तावित आहेत. ठाणे तालुक्यातील शासकीय जमिनीवर सुमारे १४७१ हेक्टर क्षेत्रावर कांदळवन आहे. ते संरक्षित करण्यासह त्याची अंतिम अधिसूचना काढण्याची कार्यवाही एक वर्षापूवीच झाली. याशिवाय, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कांदळवन संरक्षण समिती स्थापन झालेली आहे. सतत होणारा ºहास थांबवण्यासाठी या क्षेत्रास राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित करण्याची प्रारूप अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाली आहे. यानुसार वाशी, तळवळी, सारसोळे, नेरूळ, घणसोली, जुहू, तुर्भे, कोपरखैरणे, गोठवली, सोनखार (नवी मुंबई) शहाबाज, दिवे, करावे आणि ऐरोली या गावांमधील कांदळवनाच्या सुरक्षेची गरज आहे.न्यायालयाचे असे आहेत आदेशसमुद्र, खाडीकिनारी उद्भवणाºया त्सुनामीच्या संकटापासून कांदळवन व तिवरांच्या जंगलामुळे बचाव होतो. यामुळे त्यांचा ºहास होऊन न देता त्यांचे संरक्षण करून वाढ करण्याचे न्यायालयीन आदेश आहेत. समुद्रातील चक्रीवादळामुळे खवळलेल्या समुद्राच्या लाटा खाडीतील कांदळवनामुळे अडल्या जातात. त्यामुळे खाडीकिनारी होणारे संभाव्य नुकसान, जीवितहानी टाळणे शक्य आहे. याचा अनुभव नुकत्याच झालेल्या क्यार वादळासह महाचक्रीवादळाच्या काळात दिसून आला.

टॅग्स :thaneठाणे