ठाणे : मेट्रोसाठी घोडबंदर भागात प्रस्तावित असलेले ओवळा येथील कारशेड रद्द होणार असल्याचे निश्चित झाले असून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा विरोध डावलून ते गायमुखजवळील जागेत हलवण्याच्या हालचाली एमएमआरडीएने सुरू केल्या आहेत.ओवळा येथे कारशेड उभारल्यास पर्यावरणाची मोठी हानी होईल आणि ही जागा व्यवहार्य नसल्याच्या मुद्द्यावर एमएमआरडीएने हा निर्णय घेतला आहे. भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी ओवळा कारशेडच्या स्थलांतरासाठी आग्रही भूमिका मांडली होती. त्यावर एमएमआरडीएचे आयुक्त यूपीएस मदान यांनी कारशेड ओवळ्याला होणार नसल्याचे सांगितले.वडाळा ते कासारवडवलीचा हा मेट्रो मार्ग गायमुखपर्यंत विस्तारून पुढे मीरा-भार्इंदरपर्यंत नेण्याचे नियोजन असल्याने कारशेडची जागा बदलली जाणार आहे. आमदार केळकर यांनी स्थानिकांची बाजू समजावून घेत ती स्थलांतरित करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्यानंतर कारशेड स्थलांतराचा निर्णय झाला.
प्रताप सरनाईकांवर संजय केळकरांची मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 2:37 AM