डोंबिवली : विधी आणि न्याय विभागांतर्गत घेण्यात आलेल्या स्वीय सहाय्यक या पदाच्या परीक्षेत डोंबिवलीच्या प्रसन्न रोझेकर याने भारतात सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला आहे. रात्र महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेणाºया प्रसन्नच्या या यशाने डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.प्रसन्नने २० जानेवारीला पुण्यात ही परीक्षा दिली. संपूर्ण भारतातून विद्यार्थी या परीक्षेसाठी आले होते. ही परिक्षा मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी होती. या परीक्षेला ३७ विद्यार्थी बसले होते. प्रसन्नने ९५.०५ मार्क्स मिळवले आहेत. या परीक्षेची माहिती १० जानेवारीला प्रसन्नला मिळाली. त्यांचा फारसा कुठे गाजावाजा नसल्याने परीक्षेला बसणाºया विद्यार्थ्यांची संख्या फारशी नव्हती. स्वीय सहाय्यक पदाच्या परीक्षेसाठी १०० शब्द प्रतिमिनिट लघुलेखन येणारा विद्यार्थी असणे आवश्यक होते. त्यासाठी प्रसन्नने ६०, ८०, १०० आणि १२० शब्द प्रतिमिनिटांच्या परीक्षा दिल्या होत्या. या परीक्षा पास होण्यासाठी साधारणपणे दोन वर्षांचा कालावधी लागतो, असे प्रसन्न सांगतो.या परीक्षेसाठी प्रसन्नला १० मिनिटांत संवाद दिला होता. हा संवाद अर्थात ४५ मिनिटांत एक हजार शब्द टाईप करायचे होते. या परीक्षेतून तिघांची निवड करण्यात आली आहे. पण प्रसन्न प्रथम आल्याने नोकरीची पहिली संधी त्याला मिळणार आहे आणि प्रसन्नने मिळेल ते पोस्टिंग स्वीकारणार असल्याचे सांगितले.प्रसन्नचे शालेय शिक्षण जोंधळे हायस्कूल येथून झाले, तर स्वामी विवेकानंद रात्र महाविद्यालयातून तो वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्षाला शिकत आहे. त्याचे वडील तुळशीदास हे रिक्षाचालक आहेत. आई संगीता ही गृहिणी आहे. त्याला एक मोठा भाऊ आहे. प्रसन्नला लघुलेखनातच पुढे करियर करण्याची इच्छा आहे. तो एमपीएससीची परीक्षाही देणार आहे.मराठी तरुणाने देशात पहिले येण्याचा मान मिळवून डोंबिवलीची मान उंचावल्याबद्दल मनसे विद्यार्थी सेनेतर्फे सागर जेधे व त्यांच्या पदाधिकाºयांनी प्रसन्नाच्या घरी जाऊन त्याला पुष्पगुच्छ दिला.प्रसन्न नोकरी करीत असतानाच रात्र महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करीत आहे. स्वीय सहाय्यकाची परीक्षा त्याने सहज पार पाडली. त्यामुळे चांगले मार्क्स मिळतील, असे वाटले होते. पण भारतात सर्वप्रथम येण्याचा मान मिळेल, असा विचार कधी केला नव्हता.
स्वीय सहाय्यक पदाच्या परीक्षेत डोंबिवलीचा रोझेकर देशात पहिला, रात्र महाविद्यालयातून शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:14 AM