शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
3
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
5
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
6
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
7
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
8
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
9
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
10
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
11
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
12
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
13
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
14
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
15
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
16
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
17
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
20
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी

संकरा नेत्रालय ठाण्यातच होणार

By admin | Published: November 14, 2015 11:50 PM

संकरा नेत्रालयाच्या मुद्यावरून सुरू झालेले वादळ आता शमण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. लोकशाही आघाडीने केलेल्या आरोपानंतर आयुक्तांनी या नेत्रालयाचा

ठाणे : संकरा नेत्रालयाच्या मुद्यावरून सुरू झालेले वादळ आता शमण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. लोकशाही आघाडीने केलेल्या आरोपानंतर आयुक्तांनी या नेत्रालयाचा चेंडू ठाणेकरांच्या कोर्टात टोलवला होता. परंतु, ते ठाण्यात व्हावे, अशी इच्छा ठाणेकरांनीही प्रकट केल्याने अखेर आता आयुक्तांमध्येही मतपरिवर्तन झाले असून लवकरच त्या दृष्टीने पावले उचलली जाणार असल्याची माहिती पालिकेने दिली. संकरा नेत्रालय या जगप्रसिद्ध संस्थेला ठाण्यात त्यांचे रु ग्णालय सुरू करण्यासाठी एक रुपया नाममात्र भाड्याने ४ एकर जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाला महासभेची गोंधळामध्ये मंजुरीदेखील मिळाली आहे. परंतु, या प्रस्तावात सत्ताधारी मंडळींनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला होता. तसेच या आशयाचे फलकही शहरभर लावले होते. त्यामुळेच आयुक्तांनी हा प्रस्तावच बासनात गुंडाळण्याचा निर्णय घेतला होता. तत्पूर्वी त्यांनी याचा चेंडू ठाणेकरांच्या कोर्टात टाकला होता. तर, या जागेत केवळ रुग्णालयच होणार नसून त्या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर, रिसर्च सेंटर आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत. संकराला जमीन देण्याचा निर्णय झाल्यानंतर तो राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. त्यानंतर, अंतिम निर्णय होणार आहे. यात ४० टक्के शस्त्रक्रिया मोफत होणार असून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मोफत सेवा उपलब्ध होणार आहे. परंतु, असे असतानाही या प्रकल्पाला विरोध झाल्याने आयुक्तांनी याचा निर्णय ठाणेकरांनी घ्यावा, असे स्पष्ट केले होते. अखेर, ठाणेकरांनीही संकराच्या बाजूने कौल दिल्याने आयुक्तांचेही मतपरिवर्तन झाले असून लवकरच या रुग्णालयाच्या कामाचा नारळ फोडला जाणार आहे.