- नितीन पंडितभिवंडी - संकेत भोसले हत्याकांडाच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी कामतघर ते प्रांताधिकारी कार्यालयावर भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात हजारो महिला,नागरिक व युवक सहभागी झाले होते.
१४ फेब्रुवारी रोजी संकेत भोसले या तरुणाला बेदम मारहाण झाली होती. या मारहाणीत मुंबई केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.मृत्यूनंतर आंबेडकरी समाजात तीव्र असंतोष पसरला असून संकेत भोसले यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी या मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या वतीने आंदोलने करण्यात येत आहेत.या प्रकरणातील १४ आरोपींपैकी १२ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
मंगळवारी रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत कामतघर राहुल नगर बुद्ध विहार ते भिवंडी प्रांत कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात घेण्यात यावे, आरोपींवर मोक्का अंतर्गत इतर विविध कलमानअंतर्गत गुन्हे दाखल करावेत, दलित वस्त्यांना संरक्षण देण्यात यावे अशा मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी कार्यालयात देण्यात आले.