ठाणे : सध्या काेराेनाच्या संकटकाळात सर्वत्रच उदासीनतेचे वातावरण आहे. या नीरस वातावरणात नीलम भाेगटे आणि प्रकाश काणेकर या बहीण-भावाने संगीताच्या जादू दाखवून ‘सप्तसूर सप्तरंग’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक सकारात्मक अनुभूती रसिकांना दिली.
‘वक्रतुण्ड महाकाय’, ‘रोज रोज आंखो तले’, ‘मेरे ख्वाबों मे’, ‘दयाघना’, ‘भंवरा बडा नादान’, ‘मुझसे इस रात की’ व ‘तिन्ही सांजा’, ‘अधीर मन झाले’, ‘धुंद मधुमती’ ‘इक दिन बिक जाएगा’ व ‘कुछ ना कहो’, ‘जाने क्या तुने कही’ व ‘ढुंढो ढुंढो रे साजना’, ‘शाम ए गम’ अशी एकापेक्षा एक गाणी कार्यक्रमात सादर करण्यात आली. ‘बागों मे बहार आयी’ आणि ‘मन सात समुंदर’ या ड्युएट गाण्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. ‘चलते चलते’ या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली. सप्तसुरांच्या या पारिवारिक कार्यक्रमाची रंगत मनीषा पत्की यांच्या निवेदनाने आणखी वाढवली.