शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

सरस्वती सेकंडरी स्कूलच्या जुन्या वास्तूला जल्लोषात निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 6:25 AM

सरस्वती सेकंडरी स्कूलची सुमारे ५३ वर्षे जुनी इमारत पुनर्बांधणीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. सध्याच्या उन्हाळी सुट्यांच्या काळात येत्या १० एप्रिलला इमारत पाडायला सुरुवात होणार असून पुढील दोन वर्षांत शाळेची सुसज्ज, अत्याधुनिक आणि पर्यावरणपूरक इमारत बांधून पूर्ण होईल.

ठाणे - सरस्वती सेकंडरी स्कूलची सुमारे ५३ वर्षे जुनी इमारत पुनर्बांधणीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. सध्याच्या उन्हाळी सुट्यांच्या काळात येत्या १० एप्रिलला इमारत पाडायला सुरुवात होणार असून पुढील दोन वर्षांत शाळेची सुसज्ज, अत्याधुनिक आणि पर्यावरणपूरक इमारत बांधून पूर्ण होईल. यादरम्यान विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, असा विश्वास संस्थेच्या विश्वस्त मंडळाला आहे. या जुन्या वास्तूला आनंदाने निरोप देण्यासाठी ‘निरोपाचा जल्लोष’ कार्यक्रम रविवारी शाळेच्याच आवारात रंगणार आहे.ठाण्यातील नौपाडास्थित सरस्वती सेकंडरी स्कूलची स्थापना १९५२ मध्ये उमा नीळकंठ व्यायामशाळेत झाली. १९६४-६५ साली शाळा आपल्या स्वत:च्या वास्तूत भरू लागली. त्याला यंदा ५३ वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे साधारण ५० वर्षे होऊन गेलेल्या इमारतीला पुनर्बांधणीची गरज आहे, हे लक्षात घेत आम्ही हा निर्णय घेतल्याचे ट्रस्टचे ज्येष्ठ विश्वस्त सुरेंद्र दिघे यांनी सांगितले.पहिल्या टप्प्यात शाळेची अर्धी इमारत पाडली जाईल. ती बांधून पूर्ण झाल्यावर दुसरा टप्पा राबवला जाईल. नवीन इमारत सहा मजल्यांची असणार आहे. सर्व शासन नियमांना अनुसरून आणि पर्यावरणपूरक अशी ग्रीन इमारत उभारली जाणार आहे. त्या इमारतीत कनिष्ठ महाविद्यालय आणि कला कौशल्य केंद्र नव्याने सुरू केले जाणार आहे. आणखी एक आनंदाची बाब म्हणजे इमारत जास्त मजल्यांची असल्याने मैदानाची जागा आणखी वाढणार आहे, असेही त्यांनी सांगितले.सध्या प्रत्येक तुकडीमध्ये ६०-६५ इतका विद्यार्थीपट आहे. मात्र, नवीन इमारत झाल्यावर मुलांकडे शिक्षकांना व्यवस्थित लक्ष देता यावे, या उद्देशाने ३५-४० चा विद्यार्थीपट तयार करण्यात येणार आहे. इंग्रजी माध्यमासाठीही नवीन इमारत मोकळ्या जागेवर उभारली जाणार आहे. मराठी माध्यम इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी सुमारे १५ कोटी, तर दोन्ही माध्यमाच्या इमारती उभारणीसाठी सुमारे २४ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.हा खर्च ट्रस्ट, आजीमाजी शिक्षक, माजी विद्यार्थी, पालक यांच्या माध्यमातून उभा करण्याचा आमचा मानस आहे. तसेच इमारतीसाठी निधी मिळावा यासाठी यादृष्टीने वर्षभर विविध उपक्रम राबवले जाणार आहे. मात्र, या पुनर्बांधणीनंतर त्या इमारतीत कोणत्याही व्यावसायिक प्रकल्पांना स्थान दिले जाणार नाही, असेही दिघे यांनी सांगितले.

टॅग्स :Schoolशाळाthaneठाणे