शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

ठाणे पूर्वच्या सॅटीसने धरला वेग; ५४ % काम पूर्ण झाल्याचा पालिकेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2022 12:28 PM

या ठिकाणी ६ मीटर उंचीचा डेक असणार असून त्यावर १४ बसथांबे असणार आहेत.

विशाल हळदे

ठाणे : ठाणे पूर्वच्या सॅटीसच्या कामाने आता वेग पकडला आहे. या प्रकल्पाचे काम ५४ टक्याहून अधिक झाल्याचे दिसत आहे. या पुलाच्या मार्गात प्रमुख अडथळा ठरत असलेल्या रेल्वेच्या हद्दीतील कामही सुरु झाले आहे. तसेच गर्डर टाकण्याचे कामही युध्द पातळीवर सुरु झाले आहे. मंगला हायस्कुल जवळील भाग थोडा कमी असल्याने त्या ठिकाणी स्टील स्वरुपातील गर्डर रेडीमेड स्वरुपात उपलब्ध करुन ते टाकले जाणार आहेत. तर हे काम डिसेंबर २०२३ र्पयत हे काम पूर्ण करण्याचा मनोदय पालिकेचा आहे.              या ठिकाणी ६ मीटर उंचीचा डेक असणार असून त्यावर १४ बसथांबे असणार आहेत. शिवाय बसेससाठी ७ हजार स्केअर मीटरचा टर्मिनलही उभारला जाणार आहेत. पूव्रेकडील बाजूस ११ हजार १०० चौसर मीटर जागा असून त्यापैकी १० हजार चौ. मी. जागा रेल्वेची असून ११०० चा.ैमी. जागेवर रस्ता आहे. इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील कोपरी पुलापासून जो तीन किमी लांबीचा रस्ता स्टेशनपर्यंत येतो तेवढा फ्लाय ओव्हर केला जाणार आहे.. तसेच या योजनेमध्ये नवीन कोपरी पुलाच्या बाजूस नव्याने आर.ओ.बी. बांधून ठाणे  रेल्वेस्थानकार्पयत किमान ५.५० मी. उंचीवर तीन मार्गिकांचा एलिव्हीटेड रोड बांधून तो मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. यांच्यामार्फत प्रस्तावित वाणिज्यिक विकासाखालील डेकला जोडण्यात येणार आहे. त्यानंतर पुढे लोकमान्य टिळक मार्ग - कृष्णा बोरकर मार्गावर दोन मार्गिकांचा एलिव्हेटेड रोड बांधून पूर्व द्रुतगती महामार्ग ओलांडून आनंदनगर बाजूस उतविण्यात येण्याचे व त्यासाठी ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळ दुसरा आर.ओ.बी. बांधला जाणार आहे. तसेच ठाणे पूर्व येथे कोपरी पुलाच्या बाजूला पार्कींगकरीता आरक्षण व फुड कोर्पोरेशन इंडियाचे जागेवर बस टर्मिनल बांधण्यात येणार आहे.

इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील कोपरी पुलापासून जो तीन किमी लांबीचा रस्ता स्टेशनपर्यंत येतो तेवढा फ्लाय ओव्हर केला जाणार आहे. त्याशिवाय स्टेशनमोरील जागेवर पश्चिमेच्या धर्तीवर ६ मीटर उंचीचा एक डेक उभारला जाणार असून वरील बाजूस टीएमटी, एसटी आणि बेस्टच्या बसेसचे १४ थांबे असणार आहेत. तर, तळमजल्यावर रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे. प्रकल्पासाठी २६५ कोटींचा निधी मंजुर करण्यात आला आहे. त्यानुसार आता याचे ५४ टक्के कामही पूर्ण झाले असून अत्याधुनिक पध्दतीने दिवसाच्या सत्रतच येथील गर्डर लॉचींगचे कामही केले जात आहे. दुसरीकडे मंगला हायस्कुल जवळ काही भाग कमी स्वरुपात असल्याने त्याठिकाणी स्टीलचे रेडीमेड गर्डर टाकले जाणार आहेत. त्या गर्डरची पाहणी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दमण येथे जाऊन केली आहे. त्यानुसार येथील गर्डर लॉन्च झाल्यानंतर याचा आणखी एक महत्वाचा टप्पा पूर्ण होणार आहे. त्यानुसार लवकरात लवकर या सॅटीसचे काम पूर्ण करुन तो ठाणोकरांच्या सेवेत देण्याचा मानस असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका