ठाणे : शिवसेवा मित्र मंडळ, ठाणे पूर्व तर्फे आयोजित स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती प्रित्यर्थ व्यंगचित्रकला स्पर्धा २०१८ चा पारितोषिक वितरण समारंभ ठाणे महापालिका खुले कलादालन, अष्टविनायक चौक, मिठ बंदर रोड, ठाणे पूर्व येथे पार पडला.
या स्पर्धेसाठी ११२ व्यंगचित्र आली होती. त्यापैकी ८२ निवडक व्यंगचित्र हि प्रदर्शनात मांडण्यात आली होती. त्यातून १७ जणांना पारितोषिक देण्यात आले. या सोहळ्यासाठी जेजे स्कुल ऑफ आर्टसचे गुरुवर्य पावसकर, जेष्ठ व्यंगचित्रकार विजयराज बोधनकर, प्रदीप म्हापसेकर, अर्कचित्रकर सतीश खोत , चित्रकार शैलेश साळवी आणी महेश कोळी अशी व्यंगचित्रक्षेत्रातील दिगग्ज मंडळी उपस्थितीत होती. या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोधनकरांनी या उपक्रमाचे व ही आगळीवेगळी स्पर्धा आयोजित केल्याबद्दल शिवसेवा मित्र मंडळाचे विशेष कौतुक केले, पालकांना त्यांनी भावीपिढीला आपले भवितव्य निवडताना कुठलेही बंधन घालू नका असे आवाहन करताना, आपले अनुभव कथन करताना, त्यांनी या अशा स्पर्धेतूनच भावी व्यंगचित्रकारांची एक नवीन पिढी तयार होईल असे सांगितले. पुढीलवर्षी या स्पर्धेतील विजेत्यांना त्यांनी स्वतःकाढलेले अर्कचित्र पारितोषिक म्हणून देण्याचे जाहिर केले, व यालाच दुजोरा देताना म्हपसेकरांनी त्यांच्या व्यंगचित्राप्रवासा संबंधी अनुभव कथन केले, महेश कोळी यांनी या स्पधेसाठी त्यांनी आयोजीत केलेल्या कार्यशाळेत केलेल्या मार्गदशनाचा स्पर्धकांनी केलेला उपयुक्त वापराबद्दल समाधान व्यक्त केले, तर शैलेश साळवी यांनी परीक्षकांचा या स्पर्धेसाठी परीक्षणावेळी 'कस' लागला व या स्पर्धेसाठी आलेल्या व्यंगचित्रांच्या उत्तम दर्जाविषयी समाधान व्यक्त केले, मंडळाचे अध्यक्ष अजय नाईक यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले, आणि शिवसेना विभाग प्रमुख गिरीश राजे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व आभार प्रदर्शन केले.