ठाणे: जे उद्दीष्ट समोर ठेवून वंचितांचा रंगमंच या चळवळीची उभारणी केली त्या उद्दिष्टाच्या दिशेने समाधानकारक पावले पडत असून वंचित मुलांच्या नाट्यविषयक जाणीवा प्रगल्भ होत आहेत असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक, नाटककार आणि दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांनी केले. त्यांच्याच संकल्पनेतुन ‘समता विचार प्रसारक संस्था’ आणि ‘बाल नाट्य’ संयुक्तरित्या दरवर्षी ठाण्यात आयोजित करत असलेल्या ‘वंचितांचा रंगमंच’ अर्थात ‘नाट्यजल्लोष’ या उपक्र माच्या समारोप कार्यक्र मात ते बोलत होते. ‘नाट्यजल्लोष’चे हे चौथे यशस्वी वर्ष आहे. ते पुढे म्हणाले, या वर्षी मुलांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. नाटकाच्या संगीत, प्रकाशयोजना सारख्या तांत्रिक बाबीही मुलांनी चांगल्या आत्मसात केल्या आहेत. नेपथ्याचीही जाण येऊन खुल्या रंगमंचाचाही कल्पकतेने वापर करू लागली आहेत. नाटिकांचे विषय निवडण्यात समज वाढली आहे, त्यात विविधता आली आहे, याचा अर्थ ते आपल्या सभोवतालच्या परिस्थितीबद्दल विचार करू लागली आहेत, तसेच रंगभूमीची भाषा त्यांना समजू लागली आहे. एकूणच सादरीकरणात वंचितांच्या रंगमचाचे वेगळे पण सिद्ध केले आहे जे मला खूप समाधान देऊन गेले. ढोलकीचा ताल, घुंगरांची छुमछुम, वेग वेगळ्या वेशभूषा केलेल्या मुला मुलींची लगबग अशा उत्साहाच्या वातावरणात वंचितांचा रंगमंच अर्थात नाट्यजल्लोषचे चौथे पर्व ठाणे टाऊन हॉलच्या खुल्या रंगमंचावर पार पडले. यावर्षी माजिवाडामधून ‘लिंग भेदा पलीकडे कला’ आणि ‘स्वयंसिद्धा’, मनोरमा नगर मधून ‘प्रश्न - मुलांमधील जिज्ञासा’, राम नगरने ‘आपत्तीकी बुझाओ बत्ती’ हे नैसिर्गक आपत्तीवर मात करण्याचे शिकवण देणारी नाटिका, किसन नगरने ‘मोल’ हे बुद्ध आंबेडकरांच्या विचारावर आधारित नाटिका, अशोक नगर मधून ‘बॅक टु ड्युटी’ हे ट्रॅफिक पोलिसांच्या जीवनावरील नाटिका, बाळकुम मधून ‘वाहतूक नियम’ ही वाहतुकीचे नियम संवेदनशीलतेणे पालवे हे सांगणारी नाटिका, ढोकाळी मधून ‘लपा छपी - एक शोध’ या निटकेमध्ये, गरीब वस्तीत छोट्या घरात मुलांना लहान न समजणाºया वयात आजूबाजूला चालणारे लैंगिक चाळे बघून त्यांच्याही मनात विपरीत विचार येवू लागतात याचे खूप वास्तववादी सादरीकरण होते, तर घनसोलीमधून ‘एक चूक - डेथ गेम’ हे बालकांच्या आत्महत्येसंबंधी ब्ल्यु व्हेल गेमवर आधारित नाटिका अशा विविध नावीन्यपूर्ण विषयांवर नाटिका सादर झाल्या. सर्वच नाटिका मनाला भिडणाºया होत्या, तरीही ढोकाळी ची ‘लपा छपी’, आणि घणसोलीची ‘एक चूक’, मनोरमा नगरची ‘प्रश्न’ आणि माजिवाड्याची ‘स्वयंसिद्धा’ या नाटीकांचे सादरीकरण उल्लेखनीय होते, ‘मोल’ चे विश्वनाथ आणि ‘वाहतूक नियम’चे अभिजीत तुपे यांचे दिग्दर्शन प्रशंसनीय होते. अभिनयामध्ये अक्षता दंडवते, प्रवीण, निनाद शेलार आणि सौरभ यांनी बाजी मारली. यावेळी किसन नगर गटाने रत्नाकर मतकरी यांचे ‘निम्मा शिम्मा राक्षस’ या बालनाट्याचा एक अंक सादर केला. ‘दृष्टी’ अकॅडमीचे प्रबोध कुलकर्णी आणि ‘अजेय’चे क्षितिज कुळकर्णी यांनी यावेळी परीक्षकाचे काम पाहिले. या उपक्रमाची संयोजिका हर्षदा बोरकर यांनी सूत्रसंचालन केले. लायोनेस क्लबच्या रश्मी कुलाकर्णी आणि सोनल कद्रेकर यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून क्लबच्या वतीने सर्वांना चहा, नाश्ता पुरविला. प्रा. किर्ती आगाशे यांनी या वेळी मुलांना सरकारच्या मोफत कौशल्य विकास कार्यक्र माची माहिती दिली. या वेळी सुरेन्द्र दिघे, सतीश अगाशे, योगेश खांडेकर, अविनाश आणि सुनीती मोकाशी, संजीव साने, जयंत कुलकर्णी, संजय बोरकर, प्रदीप इंदुलकर, किरणपाल भारती, प्रजापती, महेंद्र भांडारे ठाण्यातील अनेक मान्यवर मुलांना प्रोत्साहन द्यायला उपस्थित होते. संस्थेचे सचिव संजय निवंगुणे, विश्वस्त जगदीश खैरालिया, जेष्ठ कार्यकर्ते मनीषा जोशी, लितका सू. मो., हर्षलता कदम, सुनील दिवेकर, युवा कार्यकर्ते कारण औताडे, दर्शन पडवळ, एनोक कोलियर, मनोज परिहार, संदीप जाधव, सोनाली महाडीक, राहुल सोनार या सर्वांचा कार्यक्र म यशस्वी होण्यासाठी मोठा हातभार लागला.
वंचितांच्या रंगमंचाची चार वर्षांची वाटचाल अपेक्षेप्रमाणेच समाधानकारक - ठाण्यात रत्नाकर मतकरी यांचे प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 6:04 PM
साने गुरु जींच्या ११८ व्या जयंतीदिनी - वंचितांच्या रंगमंचाच्या चौथ्या पर्वाचा समारोप करण्यात आला. कष्टकºयांच्या लोकवस्तीमधील, आधुनिक एकलव्यांनी स्वत:च्या जाणीवेतून उभ्या केलेल्या नाटिकांचे सादरीकरण रविवारी टाऊन हॉल येथे करण्यात आले.
ठळक मुद्दे‘वंचितांचा रंगमंच’ अर्थात ‘नाट्यजल्लोष’ या उपक्र माच्या समारोपवंचित मुलांच्या नाट्यविषयक जाणीवा प्रगल्भ होत आहेत - रत्नाकर मतकरीविविध नावीन्यपूर्ण विषयांवर नाटिका सादर