मीरा रोड : दुचाकीवरुन येऊन सोनसाखळी खेचून पळणाऱ्या दोघा सराईत आरोपींना विशेष पथकाने ताब्यात घेऊन ५ गुन्हे उघड करत सव्वा लाखांचे दागिने जप्त केले आहे. मीरा भाईंदरमध्ये सोनसाखळी चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. दुचाकी वरुन येऊन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी, मंगळसुत्र खेचुन पळणाऱ्या चोरट्यांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या चोरांना आळा घालण्यासाठी पोलिस अधिक्षक डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक नरसिंंह भोसले यांनी विशेष पथक तयार केले. यात प्रत्येक पोलिस ठाण्यातील दोन पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहाय्यक निरीक्षक पवार व उपनिरीक्षक कारंडे यांनी या प्रकरणी रियाज जमाल गाझी व नियाजआलम शेख या दोघा सराईत सोनसाखळी चोरट्यांना ताब्यात घेतले. तपासात त्यांनी नवघर व नयानगर पोलिस ठाणे हद्दीत प्रत्येकी दोन व काशिमीरा हद्दीत एक सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याचे उघड झाले. सव्वा लाखांचे सोन्याचे दागीने जप्त केले आहेत. (प्रतिनिधी)
सराईत सोनसाखळीचोर ताब्यात
By admin | Published: April 26, 2017 11:53 PM