डोंबिवली: स्वा. सावरकरांनी मराठी भाषेत अनेक नवे शब्द रुढ केले. भाषाशुद्धीची प्रेरणा बहुदा त्यांना शिवचरित्रावरुन मिळाली. शिवरायांच्याकाळी फारसी शब्दांचा उपयोग सर्वत्र केला जात असे. याला उत्तर म्हणुन त्यांनी रघुनाथपंत हनुमंते यांना आदेशीत करुन राजव्यवहार कोश निर्माण केला. तद्वतच सावरकरांनी दिलेले महापौर, दिनांक, अध्यासन, प्रपाठक, विधिज्ञ, टपाल, दुरमुद्रक, नेपथ्य आदी शब्द आज उपयोगात आणले जातात. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने सावरकरांची भाषाशूद्धीची तळमळ आपण लक्षात घ्यायला हवी असे मत इतिहास व्याख्याते, अभ्यासक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी व्यक्त केले.सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्त ते पोर्टब्लेअर अंदमान येथून उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. त्यानंतर त्यांनी लोकमतला तेथून ही माहिती देतांना सावरकरांचे मराठीसाठी योगदान या विषयी बोलतांना वरील माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, सध्या वृत्तपत्रे,वाहिन्या चर्चा वा साहित्यातून अनेकदा इंग्रजी शब्द उपयोगात आणले जातात. अन्य भाषेतील शब्द आपल्या भाषेत आणल्यामुळे भाषा समृद्ध होते असा फसवा युक्तीवाद केला जातो. मात्र त्यामुळे मूळ भाषेतील त्या अर्थाचा शब्द मरतो. त्याचे काय? असा सवाल डॉ. शेवडे यांनी केला. पोर्टब्लेअरमधील महाराष्ट्र मंडळामध्ये ते बोलत होते. त्या व्याख्यानाच्या निमित्ताने त्यांनी सावरकरांची अंदमाची उडी, त्यामागील राजकारण, त्यांचे अंदमान वास्तव्य आदी अनेक बाबींचा उहापोह केला. तत्पूर्वी याचदौ-यादरम्यान सेल्यूलर तुरुंगात ‘अंदमान पर्व’ या विषयावरही डॉ, शेवडेंनी उद्बोधन केले. गेली १०वर्षे सलग सावरकर आत्मार्पण दिनी सेल्यूलर तुरुंगात व्याख्यान देण्याची अनोखी परंपरा त्यांनी सुरु ठेवली आहे.आपल्या चित्रदर्शी शैलीतील व्याख्यानातून त्यांनी अंदमानातील छळपर्व उपस्थितांसमोर मांडले. देशासाठी हालअपेष्टा सहन केलेल्या या मृत्यूंजय क्रांतीविराचे लंडनमधील निवास स्थान सरकार कधी ताब्यात घेणार? आणि सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? या दोन प्रश्नांनी महामंडळातील सभेची सांगता झाली. महाराष्ट्रामधील सुमारे ७०० सावरकरप्रेमींनी त्या व्याख्यानाला उपस्थिती लावली होती. सभेचे प्रास्ताविक अरविंद पाटील यांनी तर समारोप गोरखनाथ पाटील यांनी केला.
भाषाशुद्धीची सावरकरांची तळमळ - डॉ. सच्चिदानंद शेवडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 6:30 PM
स्वा. सावरकरांनी मराठी भाषेत अनेक नवे शब्द रुढ केले. भाषाशुद्धीची प्रेरणा बहुदा त्यांना शिवचरित्रावरुन मिळाली. शिवरायांच्याकाळी फारसी शब्दांचा उपयोग सर्वत्र केला जात असे. याला उत्तर म्हणुन त्यांनी रघुनाथपंत हनुमंते यांना आदेशीत करुन राजव्यवहार कोश निर्माण केला. तद्वतच सावरकरांनी दिलेले महापौर, दिनांक, अध्यासन, प्रपाठक, विधिज्ञ, टपाल, दुरमुद्रक, नेपथ्य आदी शब्द आज उपयोगात आणले जातात. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने सावरकरांची भाषाशूद्धीची तळमळ आपण लक्षात घ्यायला हवी असे मत इतिहास व्याख्याते, अभ्यासक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देसावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्त ते पोर्टब्लेअर अंदमान येथून उपस्थितांना मार्गदर्शन महाराष्ट्र मंडळामध्ये ते बोलत होते