भिवंडी : तालुक्यातील दुगाड येथे शनिवारी रात्री प्राथमिक शाळेचे छत कोसळल्याची घटना घडली. ही दुर्घटना रात्री घडल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे. दुगाड गावात चौथीपर्यंत शाळा असून १०२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेत चार वर्ग असून यातील पहिलीच्या वर्गाचे छत कोसळले. अन्य तीन वर्गांच्या भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे तेही कधीही कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.या शाळेचे बांधकाम २५ वर्षांपूर्वीचे आहे. इमारतीच्या छतावर लाकडी वासे व कौले टाकण्यात आलेली आहेत. लाकडी वासे सडल्याने छत कमकुवत झाले होते. त्यातच पाऊसही पडत आहे. त्यामुळे पाऊस आणि वारा यांचा दाब सोसू न शकल्याने शाळेचे छत कोसळून दुर्घटना घडली. आता या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी घराचा आसरा घ्यायची वेळ आली आहे.दरम्यान, मौजे दुगाड येथील मोडकळीस आलेल्या प्राथमिक शाळेच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मंजूर असून या शाळेची दुरुस्तीही करण्याचे प्रस्तावित होते. मात्र, स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी या दुरु स्तीस विरोध केल्याने शाळेची दुरुस्ती होऊ शकली नाही. त्यामुळेच ही दुर्घटना घडली, अशी प्रतिक्रि या अनंता शेलार यांनी व्यक्त केली आहे.>मला काही माहीत नाहीभिवंडी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी हे रजेवर असल्याने प्रभारी गटशिक्षणाधिकारी संजय थोरात यांना या घटनेबद्दल विचारले असता मला काही माहीत नाही. संबंधित शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांशी विचारपूस करून माहिती देतो, असे त्यांनी सांगितले.
शाळेचे छत कोसळले, वर्गखोल्या धोकादायक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 12:48 AM