शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

शाळेच्या आवारात उभारले 'गाव'; शाळा सुरू झाल्यावर मुले घेणार गावची मजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2021 4:41 PM

ओसाड जागेतही फुलवली वनराई

- प्रज्ञा म्हात्रेठाणे : लॉकडाऊनमुळे गावी न जाऊ शकलेल्या आणि ज्यांना गाव नाही अशा विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाल्यावर आता गावची मजा घेता येणार आहे. लॉकडाऊनमधील वेळेचा सदुपयोग करत श्रीरंग शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाने विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या आवारात 'गाव' उभारले आहे तर विद्यार्थ्यांना देशी झाडांची ओळख व्हावी म्हणून शाळेच्या मागील ओसाड जागेत तब्बल ३०० झाडे लावून विद्यार्थ्यांना शेती कशी करावी याचे धडे दिले जाणार आहे.                    

कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाले आणि सर्व शाळा कुलूपबंद झाल्या. ऑफलाईन शिक्षण ऑनलाइन सुरू झाले. शाळेत आल्यावर या विद्यार्थ्यांना निसर्गाची जवळून ओळख व्हावी तसेच, गावाविषयी ओढ निर्माण व्हावी, गावात आल्यासारखे वाटावे यासाठी श्रीरंग शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सरचिटणीस प्रमोद सावंत यांनी आपल्या संकल्पनेतून टाकाऊपासून टिकाऊ वस्तू वापरून शाळेच्या आवारात गाव उभारले. यात टुमदार घर, पाट, हौद, तुळशीवृंदावन हे सर्व त्यात पाहायला मिळत आहे. आजकाल शहरात वाढलेल्या मुलांना 'गाव' या संकल्पनेची ओळख करून देण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न असल्याचेही सावंत म्हणाले. या टुमदार घरासाठी त्यांनी जुनी लाकडे वापरली आहे आणि त्या घराला गावाच्या घराचा रंग दिला आहे. त्याचप्रमाणे शाळेमागील आवारात त्यांनी तब्बल ३०० देशी वृक्षांचे रोपण करून वनराई फुलवली आहे. शाळेमागे असलेल्या या ओसाड जागेत रॅबिट आणि नाल्यातील कचरा टाकून तेथे घाणीचे साम्राज्य पसरले होते. शाळेने तेथील ७० ते ८० ट्रक रॅबिट काढून त्याठिकाणी सुरुवातीला मिरच्या, टोमॅटो, कारले या भाज्यांची लागवड केली. त्यानंतर हळूहळू वांगी, केळी, आंबा, सोनचाफा, चिकू, कॅन्सर फ्रुट (हनुमान फळ), गोल्डन शॉवर, इलायची, ओवा, तुतीन ते चा प्रकारांची तुळस, नारळ, जांभूळ, कढीपत्ता यांसारखी विविध झाडे त्यांनी लावली आहेत. यापुढे औषधी वनस्पती आणि पालेभाज्या लावण्याचा मानस असल्याचे सावंत यांनी सांगितले.