शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

पालिकेची चेना शाळा क्र. १० होणार डिजिटल; पालिकेची पहिली डिजिटल शाळा ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 10:17 PM

मीरा-भार्इंदर महापालिकेची चेना मराठी शाळा क्र. १० लवकरच डिजिटल होणार असुन त्यातील बहुतांशी आदिवासी विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळण्यास सुरुवात होणार असल्याने विद्यार्थी व शिक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे.

- राजू काळेभार्इंदर, दि. २५ - मीरा-भार्इंदर महापालिकेची चेना मराठी शाळा क्र. १० लवकरच डिजिटल होणार असुन त्यातील बहुतांशी आदिवासी विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळण्यास सुरुवात होणार असल्याने विद्यार्थी व शिक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे.शहरात पालिकेच्या विविध माध्यमांच्या ३५ शाळा आहेत. या शाळांतील शैक्षणिक दर्जा खाजगी शाळांच्या तुलनेत सुमार असल्याचा आरोप सर्वच स्तरातुन केला जातो. त्यामुळे पालिकेने खाजगी शाळांतील दर्जेदार शिक्षण गरीब व गरजु विद्यार्थ्यांना मोफत मिळावे, यासाठी खाजगी शाळांना व्यावसायिक ऐवजी ५० टक्के निवासी कर आकारण्यास सुरुवात केली. त्यातुन २५ टक्के जागा त्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याचा आदेश काढण्यात आला. परंतु, त्याची ठोस अंमलबजावणी केली जात नाही. परिणामी त्या विद्यार्थ्यांना पालिकेच्या शाळेखेरीज पर्याय नसल्याने ९ वी नंतरचे शिक्षणही बेभरोसे राहते. कारण पालिकेच्या शाळा ८ वी पर्यंतच असुन ८ वीचे वर्गही काहीच शाळांत सुरु करण्यात आले आहेत. पालिका शाळांतील विद्यार्थी पटसंख्या वाढावी, यासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांसह गणवेशाचे मोफत वाटप करते. परंतु, शिक्षणाचा दर्जा खाजगीच्या तुलनेत वाढत नसल्याने सध्या डिजिटल होत असलेल्या खाजगी शाळांप्रमाणेच पालिका शाळासुद्धा डिजिटल करण्याचा प्रयत्न एक वर्षापुर्वी सुरु झाला. त्याला नुकतेच यश आल्याने डिजिटल शाळेसाठी सुरुवातीला चेना मराठी शाळेची निवड करण्यात आली आहे. हि शाळा शहराच्या वेशीवर तसेच संजय गांधी राष्टÑीय उद्यानाला लागुन असल्याने या शाळेत बहुतांशी आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. १ ली ते ८ वी पर्यंतचे एकुण ८ वर्ग असलेल्या शाळेत २४१ विद्यार्थी शिक्षण घेत असुन मुख्याध्यापकांसह आठच शिक्षक कार्यरत आहेत. या विद्यार्थ्यांना डिजिटल बोर्डद्वारे शिक्षण देण्याच्या कार्यवाही अंतर्गत सुरुवातीला एक डिजिटल बोर्ड देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना भौगोलिक, ऐतिहासिक,  विज्ञान, सांस्कृतिक सचित्र ज्ञान मिळावे, यासाठी शाळेत २१ संगणक बसविण्यात येणार असुन सुसज्य लायब्ररी साकारण्यात येणार आहे. डिजिटल शिक्षण देण्यासाठी सुरुवातीला खाजगी शिक्षकाची तात्पुरती नियुक्ती करण्यात येणार असुन त्याचे प्रशिक्षण शिक्षकांना सुद्धा दिले जाणार आहे. डिजिटल शिक्षणाचा लाभ प्रामुख्याने आदिवासी व इतर गरीब विद्यार्थ्यांना होणार आहे.  

पालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रमुख, उपायुक्त दिपक पुजारी : डिजिटल शिक्षण देण्यास चेना मराठी शाळेपासुन सुरुवात होणार असली तरी उर्वरीत पालिका शाळांतही ते लवकरच सुरु केले जाणार आहे. खाजगी शाळांच्या तुलनेत पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना अद्यावत शिक्षण देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडुन केला जात आहे. 

चेना शाळेचे मुख्याध्यापक विश्वास हिरे : डिजिटल शिक्षणासाठी चेना मराठी शाळेची निवड झाल्याने विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांत आनंदाचे वातावरण आहे. 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी