कल्याण : आठवड्याभरापूर्वी भारताची अंतराळीन संस्था इस्रोने गगन भरारी घेत 100 यशस्वी सॅटेलाईट प्रक्षेपण केले या अभिमानास्पद क्षणांचा मागोवा घेत डोंबिवली मध्ये 30 व 31 जानेवारी रोजी कल्याण डोंबिवली परिसरातील पहिले भव्य अंतराळ विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे .या प्रदर्शनाला कल्याण डोंबिवली सह आसपासच्या परिसरातील शाळांमधील सुमारे 20 हजार विद्यार्थी उपस्थित राहनार असून आम्ही जगातील सर्वात मोठी विज्ञान कार्यशाळा आयोजित करण्याचा विश्वविक्रम करत असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे .
नासा,डावखर इंफास्टरक्चर प्रा ली,समर्थ पेट्रोलियम,स्पेस नॉट, रिजन्सी निर्माण ली,जागतिक विश्वविक्रम नोंद ठेवणारी संस्था या सर्व संघटनेच्या संयुक्त विद्यमाने कल्याण डोंबिवली परिसरातील पहिले भव्य अंतराळ विज्ञान प्रदर्शन 30 व 31जानेवारी रोजी डोंबिवली पुर्वेकडील कल्याण शीळ रोड विको नाका गोळवली येथिल रिजेन्सी निर्माण लिमिटेड येथे सकाळी दहा ते सायंकाळी आठ या दरम्यान आयोजित करन्यात आले आहे .अंतराळ प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना अंतराळ व खगोल शास्त्रामध्ये स्वारस्य घेन्यास प्रवृत्त करण्यासाठी आम्ही विशेष अंतराळ विज्ञान प्रदर्शनचे आयोजन करण्यात आले आहे .हे प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य असून सुमारे 20 हजार हुन अधिक विद्यार्थी पालकवर्ग या प्रदर्शनास उपस्थित राहणार आहेत .या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना अंतराळ विश्व बद्दल तसेच अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान याबद्दल इत्यंभूत माहिती घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे .नासा ,रशिया ,जपान, इ ए एस ए व इस्रो द्वारे निर्मित दुर्मिळ असे जागतिक उपग्रह आणि रॉकेट यांच्या प्रतिकृती प्रदर्शनात ठेवन्यात येणार आहे .शंभराव्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणचे औचित्य साधून एक दिवस विशेष इस्रो गॅलरी सदर प्रदर्शनत तयार करन्यात अली आहे .सदर प्रदर्शनात खगोलशास्त्रज्ञांचे विशेष संवाद शिबिर आयोजित करण्यात आले आहे .अंतराळ विश्वावद्दल 20 मिनिटांचा विशेश माहितीपट देखील उपलब्ध असणार आहे .उपस्थित विद्यार्थ्यांना या प्रदर्शनात सिम्युलेशन प्रोग्रामाद्वारे उपग्रहांचे थेट ट्रेकिंग वापरून रियलटाईम प्लेनेटरी पोसिशन पहावयास मिळतील या मध्ये काही शाळांच्या पण संबंधित प्रतिकृती प्रदर्शनात ठेवन्यात येणार आहेत.व भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रदर्शनातील टेलिस्कोप बद्दल जवळून माहिती देऊन ते हाताळन्याचे तंत्र शिकवले जाणार आहे .सदर प्रदर्शन सोशल मीडियावर थेट प्रसिद्ध केले जाणार आहे . आयोजकांनी या कार्यक्रमाच्या आधारे आम्ही जगातील सर्वात मोठी विज्ञान कार्यशाळा आयोजित करण्याचा विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न करत असून त्याची नोंदणी व सर्वेक्षण आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड सेंटर ही संस्था करणार असल्याचे सांगितले .सदर प्रदर्शन नासा या अमेरिकन एजन्सी सोबत भागीदारी करून प्रदर्शित करनार असून प्रदर्शन नासाच्या अधिकृत संकेस्थळावर प्रसिद्ध असणार आहे .सर्व सामान्यांनी विनामूल्य प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे . याआधी ही काही वर्ष संतोष डावखर यांची टीम तर्फे सर्प प्रदर्शन,शस्त्र प्रदर्शन ,नाणी प्रदर्शन आशा विविध समाजऊपयोगी कार्यक्रमचे आयोजन केले असून दरवर्षी 12 ते 15 विद्यार्थी व पालक या कार्यक्रमाला उपस्थित राहतात .