जान्हवी मोर्येडोंबिवली : इयत्ता बारावीचा निकाल आॅनलाइनद्वारे जाहीर होताच प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरातून बारावीचे १७ हजार २२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परंतु, प्रथम वर्षासाठी महाविद्यालयांमध्ये विविध अभ्यासक्रमांच्या केवळ सहा हजार ०९५ जागाच उपलब्ध आहेत. त्यामुळे उर्वरित ११ हजार १३१ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण होणार आहे.कल्याण-डोंबिवलीत प्रगती, मॉडेल, पेंढरकर, मंजुनाथ, बिर्ला, अग्रवाल, सोनावणे, मुथा ही वरिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यात कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या व्यतिरिक्त बॅकिंग अॅण्ड इन्शुरन्स, बीएमएस, बीएमएम, आयटी, कॉम्प्युटर सायन्स आदी विविध अभ्यासक्रम शिकवले जातात. कनिष्ठ महाविद्यालये जास्त असली तरी येथे पदवीच्या शिक्षणासाठी तितकी महाविद्यालये नाहीत. मोठ्या संख्येने उत्तीर्ण होणारे बारावीचे विद्यार्थी आणि महाविद्यालयांमधील मर्यादित जागा, यामुळे प्रवेशाचा पेच निर्माण झाला आहे. परिणामी १७ हजार विद्यार्थ्यांना येथे प्रवेश मिळणे कठीण आहे.प्रवेश प्रक्रियेच्या नियमानुसार, जेथे कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालये एकत्र आहेत, तेथे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वरिष्ठ महाविद्यालयात प्राधानान्ये प्रवेश मिळतो. परंतु, एखादा विद्यार्थी कल्याणच्या कनिष्ठ महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेला असल्यास त्याला डोंबिवलीतील वरिष्ठ महाविद्यालयात आॅनलाइन प्रक्रियेनुसार गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिला जाणार आहे. यापूर्वी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत आसपासच्या ३० महाविद्यालयांचा पर्याय व नावे सूचविण्याची अट होती. यंदाच्या वर्षी १० महाविद्यालयांची नावे सुचवता येणार आहेत.काही विद्यार्थी उल्हासनगरातील चांदीबाई, आर. के. तलरेजा कॉलेज, ठाण्यातील बांदोडकर, मुलुंडमधील वझे-केळकर व काही मुंबईतील महाविद्यालयांची नावे सुचवू शकतात. सगळेच विद्यार्थी हे कल्याण-डोंबिवलीतील महाविद्यालयांना पसंती देतीलच असे नाही. याशिवाय कर्जत, नेरळ, खोपोली, आसनगाव तसेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वाशी येथील महाविद्यालयांतील व्यावसायिक अभ्यासक्रम व इंजिनिअरींगलाही काही विद्यार्थी पसंती देऊ शकतात. त्यामुळे ११ हजार विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा प्रश्न निर्माण होईलच असे नाही, असे महाविद्यालयांतील सूत्रांनी सांगितले.सोनावणे कॉलेजचे उपप्राचार्य अशोक पडवेकर म्हणाले, कला शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होत आहे. ठाणे विभागात तीन-चार वर्षांपासून हे दिसत असून, त्याचे नेमके कारण समजत नाही. यंदा निकाल मागच्या वर्षांच्या तुलनेत दोन टक्क्यांनी वाढला आहे. कॉमर्स शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा अधिक आणि जागा कमी असल्याने या शाखेत प्रवेशासाठी चुरस जास्त असणार आहे. कला शाखेच्या शिक्षणाचा टक्का घसरला आहे, तर अन्य अभ्यासक्रमांकडे तो वाढतो आहे.मुथा कॉलेजच्या प्राचार्या श्रुती वाईकर म्हणाल्या, यंदाच्या वर्षी निकाल चांगला लागला आहे. त्यामुळे अॅडमिशन फुल्ल होणार आहेत. विद्यार्थ्यांचा कल हा व्यवसायिक अभ्यासक्रमांकडे जास्त असतो. महाविद्यालयातील प्रवेशाच्या जागा मागील वर्षीप्रमाणे असून त्यात कोणताही बदल झाला नाही.पेंढरकर कॉलेज, डोंबिवलीकला- २४०(मराठी), १२० (इंग्रजी), वाणिज्य-४८०, विज्ञान- १२०, बीएससी कॉम्युटर सायन्स- ६०, बीएससी बायोटेक- ३५, बीएससी आयटी- ६०, बीएमएस- १२०, अकाउण्ट अॅण्ड फायनान्स- १२०, बॅकिंग अॅण्ड इन्शुरन्स- १२०.बिर्ला कॉलेज, कल्याणवाणिज्य- ६००, बीएससी- २४०, कला- ३६०, बीएससी कॉम्प्युटर सायन्स- ७२, आयटी- १२०, बीएमएस- १८०, मॅनेजमेंट अॅण्डस्टीडज् - १२० ,अकाउण्ट अॅण्ड फायनान्स- १२०मुथा कॉलेज कल्याणकला-१२० (मराठीमाध्यम), वाणिज्य- २४०, विज्ञान- १२०, बीएमएस-६०, बॅकिंग इन्शुरन्स-६०,कॉम्युटर सायन्स - ६०, आयटी-६०प्रगती कॉलेज, डोंबिवलीकला-१२०, वाणिज्य-२४०, बीएमएस-६०, बँकिंग आणि इन्शुरन्स-६०, बीएस्सी आयटी-६०सोनावणे कॉलेज, कल्याणकला-२४० (मराठी माध्यम), वाणिज्य-६००, विज्ञान-१२०, बीएमएस-१२०, बीएस्सी आयटी-१२०, बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स-४८
११ हजार विद्यार्थ्यांपुढे पेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 1:21 AM