ठाणे: दोन वर्षे कोरोना होता त्यामुळे निर्बंध होते मात्र सहा महिन्यापूर्वी आपले सरकार आले. त्यानंतर गोविंदा आला, गणपती उत्सव साजरा झाला. उंचीची मर्यादा काढायला लावली, गणेश उत्सव मंडळाला देखील सवलत दिली, मात्र हे करीत असताना मूर्तिकार हा घटक वंचीत राहिला होता.
पावसाचा फटका त्यांनाही बसतो मूर्ती भिजतात, मूर्ती वाहून जातात, त्यात मूर्तिकार हा एक महत्वाचा घटक आहे, परदेशात आपल्याकडील मूर्ती जातात, तिकडे मागणी आहे , त्यांच्यात आपलकुची भावना असते, मात्र आता मूर्तिकार यांच्या हिताचा निर्णय लवकरच घेतला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिले.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक, ठाणे येथे महाराष्ट्र मूर्तिकार संघटना व आशुतोष म्हस्के आयोजित 'गणांक' गणेशमुर्ती प्रदर्शनाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेकी शिंदे यांनी आश्वासन दिले.