शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या १६०० रुग्णांचा शोध; आरोग्य विभागाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 1:43 AM

ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात ३०२ नवे रुग्ण सापडले आहेत. यासह शहरात ३० हजार ९०३ रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या ९०७ झाली आहे.

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार ६०० रुग्णांचा शोध मंगळवारी घेण्यात आला. या रुग्णांसह आतापर्यंत एक लाख ४९ हजार ४४० रुग्ण जिल्ह्यात झाले आहेत. तर ३४ जणांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यात तीन हजार ९८३ मृतांची नोंद झाल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अहवालावरून उघड झाली.ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात ३०२ नवे रुग्ण सापडले आहेत. यासह शहरात ३० हजार ९०३ रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या ९०७ झाली आहे. कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात ३९६ रुग्ण नव्याने आढळले असून, पाच जणांचा मृत्यू झाल्यामुळे या शहरातील मृतांची संख्या ७३९ झाली. उल्हासनगरला ३० रुग्ण नव्याने आढळल्याने शहरात आतापर्यंत आठ हजार ३४९ बाधितांची नोंद झाली. तर तिघांचा मृत्यू झाल्यामुळे २५५ मृतांची नोंद आतापर्यंत झाली आहे. भिवंडी मनपा कार्यक्षेत्रात ३५ रुग्ण नव्याने सापडले आहेत.मीरा-भार्इंदरमध्ये १७७ रुग्णांची नोंद झाली. अंबरनाथ शहरात ६० रुग्ण आढळून आले असून, तीन मृत्यू झाले आहेत. या शहरात आता पाच हजार ५८६ बाधित तर २०९ मृतांची नोंद झाली आहे. याप्रमाणेच बदलापूरमध्ये ८१ रुग्ण सापडल्यामुळे बाधित रुग्ण पाच हजार १६७ झाले आहेत.नवी मुंबईत ४०५ रुग्ण कोरोनामुक्तनवी मुंबई : शहरात दिवसभरात ४०५ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत तब्बल २७१८२ जण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७ टक्के झाले आहे. नवी मुंबईमध्ये मंगळवारी ३११ नवीन रुग्ण आढळले असून एकूण रुग्ण संख्या ३१३१६ झाली आहे. शहरात रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण ६८ दिवसांवर पोहचले असल्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे.वसई-विरारमध्ये २६८ नवे रुग्णवसई : वसई-विरार शहरात मंगळवारी नालासोपारा शहरात दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर बाधित रुग्णसंख्या २६८ ने वाढली. मात्र दिलासादायक म्हणजे दिवसभरात २०७ रुग्ण विविध रुग्णालयांतून मुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीत आता एकूण रुग्णसंख्या १९ हजार ७९९ वर पोहोचली असून वसई-विरार २० हजारच्या उंबरठ्यावर पोहचले आहे.रायगडमध्ये ६४६ नव्या रु ग्णांची नोंदअलिबाग : रायगड जिल्ह्यात मंगळवारी १५ सप्टेंबर रोजी ६४६नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचीनोंद झाली आहे. त्यामुळेबाधितांची संख्या ३८ हजार ४१९ वर पोचली आहे.दिवसभरात १५ जणांचा मृत्यू झाला आहे, आतापर्यंत एकूण १०३७ जणांना मृत्यूने कवटाळले आहे तर, ३० हजार ८१८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस