- अजित मांडके ठाणे - मुंबईतील निर्मल नगर परिसरात आढळून आलेल्या बोगस शपथपत्रा प्रकरणी चौकशी करून मुख्य सूत्रधाराचा शोध घ्यावा. अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. अशी बोगस शपथपत्र तयार करण्यासाठी त्या नोटरीला दहा कोटी रुपये दिल्याचा आरोपही त्यांनी केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जीं शपथपत्रे सादर केली आहेत. ती बोगस आहेत असा आरोप या पत्रकार परिषदेत त्यांनी केला. निर्मल नगर येथे जी शपथपत्र आढळून आली आहेत. त्यातील ९९.९९ टक्के लोकांनी सांगितले की ही शपथपत्र आमची नाहीत. ज्या नोटरीने ही शपथपत्र तयार केली आहेत. तो आता गायब झाला आहे. त्याला आधी पकडून त्याची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली. अशी बोगस शपथपत्र तयार करण्यासाठी त्या नोटरीला दहा कोटी रुपये दिल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांच्याकडून जीं शपथपत्र निवडणूक आयोगाला सादर केली आहेत. त्याची निवडणूक आयोगाने खातरजमा करावी अशी मागणीही म्हस्के यांनी केली. याबाबत पोलिसांनी चोकशी करून तात्काळ गुन्हा दाखल करून मुख्य सूत्रधाराला पकडावे. अशी मागणी केली. त्याचप्रमाणे ज्यांच्या नावाने ही शपथपत्र आहेत. त्यांची पण चोकशी व्हावी प्रत्येक जिल्ह्यात अशी बोगस शपथपत्र तयार झाली आहे. ही शपथपत्र ठाकरे गटाची असल्याने त्यांचाच याप्रकरणी हात असून मतदार याद्या समोर ठेवून ही शपथपत्र तयार केली.असल्याचा आरोप म्हस्के यांनी या पत्रकार परिषदेत केला. शिवसेना हा विचार आहे ती खाजगी कंपनी नाही.असा टोलाही लगावाला. तर लटके प्रकरणी त्यांना प्रश्न विचारला असता आगे आगे देखो होता हें क्या असे उत्तर त्यांनी दिले.
तर शिवसेनेच्या शाखेवर कोणत्या गटाचा अधिकार असेल असा सवाल नरेश म्हस्के यांना विचारला असता ते म्हणाले की याबाबत स्थानिक कार्यकर्ते निर्णय घेतील असे सांगितले.