- धीरज परबमीरा रोड: सरकारने तीन वर्षांपासून मासेमारीचा १ आॅगस्टपासूनचा ठरवलेला मुहूर्त उत्तन व परिसरातील मच्छीमारांसाठी नुकसानीचा ठरत आहे. खवळलेला समुद्र, वादळी वारे व पाऊस यामुळे उत्तन ते चौक परिसरातील ७५० मासेमारी बोटींपैकी शुक्र वारपर्यंत जेमतेम निम्म्या बोटी मासेमारीसाठी गेल्या. खवळलेल्या समुद्रामुळे अनेक बोटी परतल्या. नारळी पौर्णिमा किंवा १५ आॅगस्टपासून मासेमारीचा हंगाम सुरू करा, अशी मागणी मच्छीमारांनी चालवली आहे.दुसरीकडे कर्नाटक, गोवा व गुजरातच्या बोटी राज्याच्या हद्दीत घुसखोरी करतात. शिवाय, पर्सेसीन नेट व मोठ्या यांत्रिकी बोटींची मासेमारी मात्र आधीपासूनच सुरू असल्याने मासळी मिळत नाही. मच्छीमारांकडून पावसाळ्यात बंद असलेली मासेमारी सुरू करण्यासाठी पिढ्यान्पिढ्या परंपरेप्रमाणे चालत आलेल्या नारळी पौर्णिमेचा मुहूर्त ठरलेला असायचा. मासेमारीचा कालावधी व ती कधीपासून सुरू करायची, यावरून विविध भागांतील मच्छीमार यांच्यात मतभेद होत होते. यांत्रिकी बोटी मासेमारीचा हंगाम सुरू होताच जमेल तशी झपाट्याने मासेमारी करत असल्याने पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या हाती नंतर फारशी मासळी लागत नसल्याची तक्र ारही सतत होत असते.तीन वर्षांपासून सरकारने मासेमारी १ आॅगस्टपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला. १ आॅगस्ट उजाडताच यांत्रिकी बोटी समुद्रात मासेमारीसाठी सुसाट जातात. मच्छीमार मात्र खवळलेला समुद्र, वादळी वारे व पावसामुळे अडखळतात. त्याचा पुरेपूर फायदा यांत्रिक बोटीचे मालक घेतात.यामुळे बºयाच मच्छीमारांचे उत्पन्न तर बुडालेच पण साहित्य, पगार यांचा भुर्दंड सोसावा लागला.मत्स्य विभागाकडून मच्छीमारांना टोकन देण्यास सुरूवातउत्तन, पाली, चौक आदी भागांत मासेमारी करणाºया सुमारे ७५० बोटी आहेत. नाखवांनी मासेमारीला जाण्यासाठी लागणारा बर्फ, डिझेल, किराणा आदी भरून घेतले. परंतु, खवळलेला समुद्र आणि वादळी वाºयामुळे निम्म्याच बोटी मासेमारीसाठी रवाना झाल्या. त्यातही अनेक बोटी माघारी फिरल्या.समुद्र खवळलेला असल्याने मासेमारीसाठी मत्स्य विभागाकडून रोज दिले जाणारे टोकनचे कामदेखील बंद केले होते. ११ आॅगस्टपासून टोकन देण्यास पुन्हा सुरुवात झाली आहे. वातावरण चांगले असल्यास आजपासून बोटी मच्छीमारीसाठी जातील, असे बोलले जात आहे.परंपरेप्रमाणे नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळाचा मान देऊन मासेमारी सुरू करण्यामागे शास्त्रोक्त कारण योग्यच होते. आम्हीही नारळी पौर्णिमा किंवा १५ आॅगस्ट आधी जे येईल, त्यापासून मासेमारी सुरू करा, असे सांगत आहोत. पण, पर्सेसीन नेट व मोठ्या यांत्रिकी बोटी तसेच अन्य राज्यांतील बोटी घुसखोरी करून आधीच मासेमारी करून मोकळे होतात.- बर्नड डिमेलो, मच्छीमार नेतेसुरुवातीचा हंगाम जर सामान्य मच्छीमारांच्या हातून जात असेल, तर १ आॅगस्टपासून मासेमारीचा सरकारचा निर्णय आमच्यासाठी नुकसानकारक ठरला.- विल्यम गोविंद, संचालक,चौक मच्छीमार संस्था
१५ आॅगस्टपासून हंगाम सुरू करा : मासेमारीसाठी निम्म्याच बोटी समुद्रात, मच्छीमार चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 3:07 AM