डोंबिवली : मध्य रेल्वे प्रशासनाने नुकतीच काही उपनगरीय लोकल डब्यांमधील आसनव्यवस्था बदलली. मात्र, यामुळे अंबरनाथ, बदलापूर, नेरळ, कर्जत, आसनगाव, टिटवाळा, कसारा या लांबच्या अंतरावरून येणाºया प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो आहे. आसनव्यवस्थेत बदल केल्याने आता डब्यात केवळ १४ च प्रवासी बसू शकतात.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून उपनगरीय लोकलच्या प्रवाशांना सुरुवातीपासूनच ठाणे - कल्याण पुढे आपल्या इच्छित स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी उभे राहूनच प्रवास करावा लागतो. यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे. सीएसएमटी येथून निघालेल्या लोकलमध्ये अभावानेच प्रवासी घाटकोपर, ठाणे स्थानकादरम्यान सहप्रवाशांना जागा देतात. अन्यथा प्रवाशांना अडीच ते तीन तास उभ्यानेच प्रवास करावा लागत असल्याची खंत कर्जत प्रवासी संघटनेचे पदाधिकारी प्रभाकर गंगावणे यांनी व्यक्त केली. असा ताटकळत प्रवास करावा लागत असेल, तर हजारो प्रवाशांना अल्पावधीतच शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागेल. याचा विचार रेल्वे प्रशासनाने करावा आणि तातडीने बदल करावा असेही ते म्हणाले.ज्या लोकलची आसनव्यवस्था कमी केली आहे, त्या सर्व उपनगरीय लोकल या केवळ कमी अंतरावरील प्रवासासाठीच चालवाव्यात. सीएसएमटी-कुर्ला मार्गावर तसेच कुर्ला - ठाणे मार्गावर अशा लोकल सोडल्यास प्रवाशांची फारशी गैरसोय होणार नाही, पण कर्जत-कसारा पर्यंत असा प्रवास करणे त्रासाचे आहे.
३२ ऐवजी १४ प्रवाशांसाठीच आसनव्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:41 AM