ठाणे - ठाणेकरांना शनिवारी सलग दुसऱ्या दिवशीही वाहतुक कोंडीचा सामना करावा लागल्याचे दिसून आले. सकाळ पासूनच घोडबंदर, माजिवडा, कॅडबरी, तिनहात नाका तसेच नाशिककडे जाणाऱ्या वाहतुकीचा वेग मंदवला होता. मुंबईकडे जाणारी वाहतुकही धिम्या गतीने सुरु होती. त्यात अवजड वाहनांची भर पडल्याने या कोंडीत आणखीनच भर पडल्याचे दिसून आले. शुक्रवारी एमएसआरडीसीकडून खड्डे बुजविण्याचे काम सुरु होते. तर शनिवारी पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतुक विभागाला कोणत्याही स्वरुपाच्या पूर्व सुचना न देता खड्डे बुजविण्याचे काम सुरु केल्याने वाहतुक कोंडी झाली होती. शुक्र वारी सकाळीसुध्दा घोडबंदर आणि कळवा पुलावर वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला होता. सकाळी ८ पासून घोडबंदर पट्ट्यात वाहतूक कोडींस सुरु वात झाली. माजिवडा मानपाडा पर्यंत ही वाहतुक कोंडी झाली होती. ठेकेदारांनी सकाळच्या सत्रात खड्डे बुजविण्यास सुरवात केल्याने ही वाहतुक कोंडी झाली होती. परंतु शनिवारी सुध्दा सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा याच मार्गावर वाहतुक कोंडी झाल्याचे दिसून आले. घोडबंदर तसेच तिनहात नाका, नितिन कंपनी, कॅडबरी, माजिवडा, नाशिक रोड, कळवा नाका या भागात वाहतुक कोंडी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे काही भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसत होते. शुक्रवारी एमएमसआरडीसी आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून वाहतुक विभागाला कोणतीही पूर्व सुचना न देता खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी कोंडी झाली होती.दरम्यान शुक्रवारी खड्डे बुजविणाºया ठेकेदारांचे काम वाहतुक पोलिसांनी बंद केले होते. परंतु शनिवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खड्डे बुजविणाºया ठेकेदारांनीच पुन्हा तीच केल्याचे दिसून आले. तिनहात नाका आणि आजूबाजूच्या परिसरात ठेकेदारांकडून खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यामुळे सकाळच्या सत्रात तिनहात नाका, नितिन कंपनी, कॅडबरी, माजिवडा, तिकडे नाशिक कडे जाणारे रस्ते, आनंद नगर चेकनाका आदी भागात दुपारी १ वाजेपर्यंत वाहतुक कोंडी झाली होती. याची माहिती वाहतुक विभागाला मिळताच, त्यांनी या ठेकेदारांना समज देत काम बंद केले आहे. रात्री १२ ते पहाटे ६ वाजेपर्यंत खड्डे बुजविण्याचे ठरले असतांना अशा प्रकारे दिवसा खड्डे बुजविले जात असल्याने त्यामुळे वाहतुक कोंडी होत असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली. या ठेकेदारांनासुध्दा नोटीस बजावण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवाय जेएनपीटी आणि पालघरवरुन येणारी अवजड वाहने ही पीक अवरलच येत असल्याने त्यामुळेसुध्दा वाहतुक कोंडी होत आहे. त्यासाठी सुध्दा उपाय योजना केल्या जात आहेत.
सलग दुसऱ्या दिवशी ठेकेदारांच्या कामाचा ठाणेकरांना मनस्ताप, बसला वाहतुक कोंडी फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 3:56 PM
ठेकेदारांच्या चुकीच्या कार्यपध्दतीचा फटका सलग दुसऱ्या दिवशी ठाणेकरांना सहन करावा लागला. ठाण्यात तिनहात नाका, नितिन कंपनी, कॅडबरी, माजिवडा, घोडबंदर भागात वाहतुक कोंडी झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शनिवारी खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती, त्याचा फटका ठाणेकरांना बसला.
ठळक मुद्देवाहतुक विभाग बजावणार ठेकेदारांना नोटीसरात्री १२ ते पहाटे सहा पर्यंत खड्डे बुजवण्याच्या सुचना