ठाणे : गेल्या महिन्यात काही दिवस १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले होते; परंतु मध्यंतरी हे लसीकरण बंद केले. मात्र, ज्या सहा हजार ६१४ नागरिकांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला होता, अशा नागरिकांना विहित मुदतीत दुसरा डोस देणे गरजेचे होते, यासाठी महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला लेखी सूचना करून हा डाेस द्यावा, असे निर्देश सोमवारी (दि. ७) दिले होते. त्यानुसार महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दखल घेऊन ९ जूनपासून ग्लोबल कोविड सेंटर येथे ऑनलाईन पद्धतीने या गटाची लसीकरण मोहिमेस मान्यता दिली आहे. यानुसार आज, बुधवारी एकूण एक हजार डोस देणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. खुशबू टावरी यांनी दिली.
त्या साडेसहा हजार जणांना आजपासून कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 4:49 AM