अंबरनाथ : येथील चिखलोली धरण येथे वन डे पिकनिकसाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. सुरक्षेच्या कारणावरून धबधब्याच्या ठिकाणी जाण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. मात्र, चिखलोली धरण परिसरात सुरक्षाव्यवस्था कुठेही दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.अंबरनाथ स्टेशनपासून पाच किलोमीटर अंतरावर चिखलोली धरण आहे. मात्र, येथे सुरक्षा नसल्याने येथे येणारे पर्यटक चिखलोलीच्या फेसाळलेल्या धबधब्यावर भिजण्याचा आनंद घेत असतात. तर काही हौशी पर्यटक धरणाच्या खोल पात्रात उड्या मारून पोहण्याची मजा घेत असतात. पर्यटकांना पाण्याच्या खोलीचा अंदाज लवकर येत नसल्याने दुर्घटना घडतात. त्यामळे वन डे पिकनिक जीवावर बेतते. या धरणात मागील वर्षीही कल्याणचा एक पर्यटक असाच धरणाच्या खोलपात्रात उड्या मारून पोहण्याचा आनंद घेताना मरण पावला. चिखलोली धरणाला सुरक्षा नसल्याने येथे येणारे पर्यटक कुठेही कसेही पिकनिक करतात. त्यामुळे सुरक्षेची मागणी होत आहे.
चिखलोलीत सुरक्षाव्यवस्था धाब्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:38 AM