शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

उमेदवाराचे काम पाहा; पक्ष नको

By admin | Published: February 21, 2017 5:50 AM

मतदान करताना नेमका कोणता विचार करावा, याबाबत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मांडलेली भूमिका

संकलन : प्रज्ञा म्हात्रे, स्नेहा पावसकरसुजाण ठाणेकर मंगळवारी नक्की आपला मतदानाचा हक्क बजावतील. त्यांनी तसा तो बजावावा, असे आवाहन ‘लोकमत’ने केले आहे. मतदान करताना नेमका कोणता विचार करावा, याबाबत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मांडलेली भूमिका दूरदृष्टीने उमेदवार निवडाप्रवीण दवणे, प्रसिद्ध लेखक : मतदान करताना मतदारांनी दूरदृष्टीने विचार करावा. ठाण्यातील वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, पर्यावरणाची शुद्धता याबद्दल जागरूक असणारा उमेदवार निवडावा. आपल्या नेत्याचे व्यक्तिमत्त्व कसे आहे, यावरून समाजाची सुसंस्कृतताही कळते. त्यामुळेच किमान चारित्र्याची चाड असणारा सुविद्य उमेदवार निवडावा. मतदान हे आपले राष्ट्रभक्ती व्यक्त करण्याचे साधन आहे, हे ओळखून मतदान करावे. मतदानासाठी दिलेली सार्वजनिक सुटी ही मतदार ‘एन्जॉय’ करण्यात घालवतात. परंतु, मतदानाचा दिवस हा सुटीचा दिवस न मानता संपूर्ण शहराच्या भविष्याचा मानावा. लोकप्रतिनिधींनी काम करायला हवे, हे जेव्हा आपण बोलतो, तेव्हा आपण आपल्याला असलेल्या मतदानाचा अधिकार बजावतो का? आपले एक मत संख्यात्मक मत न मानता भविष्यात्मक मत मानावे. ‘एक’मत हे विकासाच्या दृष्टीने पुढे नेणारे ही भावना मतदाराच्या मनात हवी. हल्ली सर्वच पक्षांचे चेहरे हे एकच झाले आहे. पक्षांची नावे मात्र वेगळी आहे. त्यामुळे मतदार गोंधळला आहे. त्यामुळे मतदाराला आपल्या प्रभागातील उमेदवार आवडत नसला, तरी त्याने आपल्याला सत्तेत कोणता पक्ष यावा असे वाटते, याचा विचार करून उमेदवाराला मत द्यावे. मत न देणे हे चुकीच्या उमेदवाराला मत देण्यासारखे आहे. त्यामुळे दूरदृष्टी ठेवून उमेदवार पात्र आहे की नाही, ते पाहावे. पक्षाची परंपरा, पक्षाचे राष्ट्रीय पातळीवर असलेले कामकाज, पक्षातील इतर नेते तुलनेने काय काम करत आहेत, याचा विचार करून मतदान करावे. स्थानिक प्रश्नांचा विचार कराअब्दुल कादर मुकादम, विचारवंत : मतदारांनी डोळसपणे मतदान करण्यासाठी गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. लोकसभा, विधानसभांच्या तुलनेत मनपा निवडणुकीतील प्राधान्याचे विषय वेगळे असतात. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित विषयास अशा निवडणुकांत अधिक महत्त्व असते. त्यामुळे महानगरीच्या विकासाचा विचार यादृष्टीने करून मतदारांनी मतदान करावे, अशी रास्त अपेक्षा आहे. नियमित पाणी, मलनि:सारण, रस्त्यांचे रुंदीकरण आणि पावसाळ्यात त्यावर पडणारे खड्डे हे विषय प्रामुख्याने समोर येतात. मतदान करताना याचा विचार करावा. रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न तर इतका जटील झाला आहे की, त्यावर काही जालीम उपाययोजनाच केली पाहिजे. प्राथमिक शिक्षण हा विषयही महानगरपालिकांच्या अधिकार कक्षातील आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत महापालिकेच्या शाळांतून मिळणाऱ्या शिक्षणाचा दर्जा खूपच चांगला होता. सांस्कृतिक क्षेत्रातही या शाळांतील विद्यार्थी अग्रेसर असत. पण, अलीकडे शाळांच्या इमारती आणि महापालिकेचा शिक्षण विभाग दोन्हीही मोडकळीस आल्यासारखे दिसतात. मतदारांनी मतदान करताना जाणीव ठेवून मतदान करावे, आणि हो! मतदारांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान करावे, कारण ते आपले नैतिक आणि कायदेशीर कर्तव्य आहे, याची जाणीव ठेवावी. आश्वासनपूर्तीकडे लक्ष द्यामेजर सुभाष गावंड : उमेदवारांनी किंवा पक्षाने मागे दिलेल्या वचननाम्यातील किती गोष्टींची पूर्तता केली, कोणते मुद्दे अमलात आणले, याचा विचार करावा. उमेदवाराची चांगली पार्श्वभूमी हवी. सार्वजनिक क्षेत्रात तो उमेदवार किती सहभाग घेतो, की केवळ निवडणूक आल्यावरच त्याला समाजकारण आठवते, या तीन गोष्टींचा प्रामुख्याने मतदारांनी विचार करावा. सर्वसामान्यांना शहर विकासासंदर्भात येणाऱ्या अडचणींचा विचार करावा. आजही परिवहनची अवस्था बिकट आहे, सुधारलेली नाही. मोडक्यातोडक्या बस आहेत. मध्येच त्या बंद पडतात. वाहतूक प्रचंड वाढत आहे आणि इतक्या वेगाने वाढतेय की, फुटपाथही वाहतुकीसाठी झाले आहेत, त्यामुळे पादचाऱ्यांना चालणे मुश्कील झाले आहे. ठिकठिकाणी कचरापेट्या रस्त्यांवर नाही, त्यामुळे एखाद्याला कचरा फेकायचा असेल, तर त्याने किती वेळ तो स्वत:जवळ बाळगावा. महिलांसाठी ई-टॉयलेट्सची सुविधा असावी, हे मुद्दे मतदाराने लक्षात घ्यावे. मतदान करून समविचारी माणसे वाढवावीत. मतदान केले तर शहराचा विकास होतो आणि अर्थात राष्ट्राचा विकास होत जातो. मतदान केले नाही, तर नकारात्मक परिणाम सोसावे लागतात, याचा मतदाराने विचार करायला हवा.प्रश्नांचा विचार कराडॉ. नितीन पाटणकर, मधुमेहतज्ज्ञ : मतदान केले तर बदलाची शक्यता नक्कीच वाढते. काय उपयोग आहे मतदानाला जाऊन? कोणीही निवडून येवो, आपल्याला काय फरक पडणार आहे? कोणीही आले तरी खाणारच! असा विचार केल्याने मतदान कमी होते. मतदान १०० टक्के होऊ लागले, तर चांगली माणसे परत निवडणूक लढवू शकतील. सध्या ठाण्यात वाहतूक ही एक मोठी समस्या आहे. खराब रस्ते, प्रचंड संख्येत असलेली वाहने, बेशिस्त पार्किंग, मुजोर रिक्षावाले, यावर ठोस उपाय सुचवू शकेल, असा उमेदवार असल्यास त्याला मतदान करायला हवे. अतिक्रमणे, सिमेंटचे वाढते जंगल आणि खऱ्या जंगलांचा खात्मा, दुर्मीळ होत चाललेले पाणी, विजेचे नखरे या समस्या काही जादूसारख्या सुटणार नाहीत. या समस्यांवर दूरवरचे प्लानिंग करून ते अमलात आणण्यासाठी प्रयत्न करेल, असा उमेदवार हवा आहे. बहुगुणी उमेदवार नाही सापडणार, पण निदान असे उमेदवार निवडणुकीला उभे राहण्याचे धैर्य एकवटू शकतील, इतके मतदान तर करू या. प्रतिमा स्वच्छ हवीअनिल काकोडकर, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ : मतदान प्रत्येकाने केलेच पाहिजे. मतदान करून आपण आपला प्रतिनिधी सभागृहात पाठवत असतो. त्याची प्रतिमा स्वच्छ आहे का, ते पाहावे. मुळात त्या प्रतिनिधीचा लोकशाहीवर विश्वास आहे का, याची खात्री करावी. ठाणे या शहराच्या एका बाजूला मुंबई मायानगरी आहे, तर दुसऱ्या बाजूला ग्रामीण भाग आहे. या दोन्हींच्या मध्ये शहर वसलेले आहे. ठाण्याच्या विकासासाठी अनेक सामाजिक संस्था काम करतात. मात्र, ठाणे शहराचा विकास करण्याबरोबरच शहरातच अजूनही काही ठिकाणी ग्रामीण परिस्थितीचे दर्शन घडते. त्या परिसरांचा विकास प्रामुख्याने झाला पाहिजे. त्याचा शहराच्या आर्थिक जडणघडणीत फरक पडेल. महानगरपालिकेचा आर्थिक स्तर सुधारण्यास त्यामुळे मदत होऊ शकेल. शहर विकासाच्या दृष्टीने सार्वजनिक वाहतूक सेवा ही बहुतांश नागरिकांना घरापासून जवळच उपलब्ध असावी. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ठरावीक वेळेपेक्षा जास्त अंतर लागू नये. दिवसेंदिवस रस्त्यांवर उतरणाऱ्या खाजगी गाड्यांची संख्या वाढते आहे. परिणामी, वाहतूककोंडी वाढते आहे. वाहतूककोंडीचा प्रश्न आणि त्याचबरोबर पार्किंगचा प्रश्न सोडवला पाहिजे.चारित्र्यसंपन्नताही महत्त्वाचीरोहित शहा, व्यावसायिक : मतदान हा आपला हक्क आहे. ते प्रत्येकाने केलेच पाहिजे. त्यातून आपल्याला योग्य लोकप्रतिनिधी निवडता येतो. आपण मतदान केले नाही, तर लोकप्रतिनिधी आणि त्यांच्याकडूनच्या अपेक्षांबाबत बोलता येत नाही. आपण ज्याला मतदान करणार आहोत, तो उमेदवार योग्य, चारित्र्यसंपन्न असावा. तो कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नसावा. कारण, आपण ज्याला मतदान करतो, तो भविष्यात आपले प्रतिनिधित्व करणार असतो. त्यामुळे आपण निवडून देणारी व्यक्ती कोण आहे, याची माहिती मतदात्यांनी घ्यावी. शहर विकासाच्या दृष्टीने पाणी, वीज, स्वच्छता या तीन प्रमुख गोष्टी आहेत. पाण्याची पुरेपूर सोय असावी. शहरातील प्रत्येक घरापर्यंत वीज पोहोचलेली पाहिजे. शहरात मोठ्या प्रमाणात जमा होणारा कचरा, घनकचरा यांची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. कचऱ्यावर योग्य प्रक्रिया झाली, तर डम्पिंगचा प्रश्न कमी होण्यास मदत होईल. या तीन बाबींचा जरी गांभीर्याने विचार करून काम झाले, तरी ठाणे स्वच्छ आणि सुंदर होईल, असे वाटते.पक्ष नव्हे, उमेदवार पाहासुलक्षणा महाजन, नगरविकासतज्ज्ञ : मतदान करणे, हे एका जबाबदार नागरिकाचे लक्षण आहे. आपल्याला जर लोकप्रतिनिधीकडून सेवा हव्या असतील, तर मतदान केलेच पाहिजे. मतदान करताना कोणताही पक्ष पाहून करू नये. तर, आपण ज्या उमेदवाराला मतदान करणार आहोत, त्याची पात्रता, क्षमता, त्याची थोडी पार्श्वभूमी आणि शहरातील, आपल्या प्रभागाबाबत त्याची माहिती किती आहे, हे पाहिले पाहिजे. आपण मत देणारा उमेदवार स्वत:च्या विचाराने चालणारा आहे की पक्षाच्या आदेशाने चालतो, याचाही विचार करावा. कारण, सध्याच्या कोणत्याही पक्षाची शहर विकासाच्या दृष्टीने कोणतीच ठोस भूमिका नाही. आपल्याला मिळणाऱ्या सेवांकरिता आपण कररूपाने पैसे भरतो. त्यामुळे फुकट सेवांचे कोणी आश्वासन देत असेल, तर त्यांनाही मतदान करू नका. शहर विकास म्हणजे मग पुढील ५ वर्षांकरिता शहरातील कोणत्याही एका प्रश्नाच्या यशस्वी नियोजनात सहभागी होऊन तो प्रश्न मार्गी लावला पाहिजे. मग तो प्रश्न पाणी, वाहतूक किंवा स्वच्छता कोणताही असला, तरी चालेल. प्रत्येक लोकप्रतिनिधीने एका तरी गोष्टीचा पाठपुरावा करावा.विकासाला हातभार लावणारा हवाएकनाथ सोनावणे, कार्यकारी सचिव, ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज : मतदान करणे, हा प्रत्येकाचा अधिकार आहे. आपण मतदान करत नसलो, तर आपल्याला शहर विकासाच्या कोणत्याही विषयावर बोलायचा अधिकार नसतो. तर, आपण ज्याला मतदान करतो, त्या उमेदवाराकडून आपल्या अपेक्षा असतात. मात्र, तो त्या अपेक्षा पूर्ण करू शकेल का, याचा एकदा विचार करून मतदान करावे आणि योग्य उमेदवारालाच मतदान केले पाहिजे. शहराच्या सर्वांगीण विकासात हातभार लावेल, अशा प्रतिनिधीला मत द्यावे. उद्योग विकास झाला; तर खऱ्या अर्थाने रोजगार वाढेल. उद्योग विकासासाठीही प्रयत्न करावेत. शहरातील प्रमुख प्रश्न मार्गी लावण्यासाठी सभागृहात पाठपुरावा करावा.लोकशाहीला बळकट कराभाऊ कदम, प्रसिद्ध अभिनेते : मतदान प्रत्येकाने आपले आवडीचे काम समजून केले पाहिजे. मतदानाच्या माध्यमातून आपण आपला सेवक निवडून देत असतो. त्यामुळे मतदान करावे. माझे एक मत मिळाले नाही, तर काही विशेष फरक पडणार नाही, असा विचार करणे अयोग्य आहे. कारण, अशा प्रकारे विचार अनेक जण करतात आणि खूप कमी मतदान होते. आपले एक मत लोकशाहीला बळकट बनवत असते. मतदान करणे, हे जागरूक मतदाराचे लक्षण आहे. मतदान करताना सुंदर आणि स्वच्छ शहर ठेवण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना जे राबवतील, त्यांचा प्राधान्याने विचार केला पाहिजे. हवा तसा उमेदवार निवडाशैलेश पुराणिक, बांधकाम व्यावसायिक : मतदान करणे, हा आपला मूलभूत अधिकार आहे, ते आपले कर्तव्यच आहे. मतदान हे आपले कर्तव्य समजून ते पार पाडणे आवश्यक आहे. परंतु ,अनेक जण मतदान करण्यासाठी टाळाटाळ करतात. लोकशाहीचा आपण एक भाग आहोत, ही जाणीव ठेवून प्रत्येकाने मतदान करावे. तुम्ही तुमचा नेता मतदानातून निवडू शकता. दिवसेंदिवस मतदान करण्याचे प्रमाण कमी होत आहे. ४० ते ५० टक्क्यांच्यावर मतदान होत नाही. तुम्हाला ज्या प्रकारचा नेता हवा आहे, तो निवडण्याचा अधिकार मतदानातून दिला आहे. आपले सरकार हे जनता कशी आहे, याचे रिफ्लेक्शन असते. आपण या सिस्टिमचा भाग आहोत, असे समजून वागावे. मत कोणाला द्यावे कोणाला नाही, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मतदान करणे अत्यावश्यक आहे. प्रत्येक जण सुज्ञ आहे. प्रत्येकाला स्वतंत्र विचारसरणी आहे. त्या विचारांच्या आधारावर मतदाराने मतदान करावे. उमेदवार निवडताना काय पाहावे, हे तुम्ही ठरवा. आपण जबाबदार नागरिक आहोत. प्रत्येकाला स्वत:चे मत आहे. नेता निवडायची संधी या मतदानातून मिळत आहे, ती मतदारांनी घालवू नये. मतदान करणार नसाल तर मग टीका करू नका आणि टीकाच करायची असेल, तर मग मतदान का करत नाही? पारखून मतदान करासुदीप नगरकर, लेखक : सर्वात महत्त्वाचे म्हणजे बहुमताचा विचार करायला हवा, अन्यथा कोणताही विकास ठाण्यात होणार नाही. शहराच्या विकासासाठी प्रत्येकाने मतदान केले पाहिजे. मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुटी देण्यात आली आहे. सुटीचा दिवस म्हणून घरी बसू नका. मतदानासाठी बाहेर पडा. कोणत्याही पक्षाला, उमेदवाराला मत द्या, पण मतदान कराच. फक्त पक्षाकडे पाहून मत देऊ नका, तर त्या उमेदवाराची योग्यता, पात्रता पाहून मत द्या. फक्त सेल्फी काढायचा, म्हणून पण मतदान करू नका, तर मतदान करताना पूर्ण विचार करा. कोणत्या उमेदवाराने खरोखरीच कामे किती केली आहेत, ते पारखून मत द्या. बदल घडायला हवा आणि त्या बाजूने उभे राहा. सध्याची परिस्थिती बदलायची असेल, तर मतदान करणे ही पायरी आहे. त्या उमेदवाराला, पक्षाला मतदान करा की, जो बदल घडवेल. प्रभागातील विकासासाठी खटपट करेल. अमुक उमेदवार आपल्या समाजाचा आहे, हे पाहून त्या उमेदवाराला मत देण्याची मानसिकता आजही समाजात आहे. आपल्यासाठी काहीतरी चांगले करेल, अशी आपली भावना असते. पण, हा विचार पूर्णपणे बदला आणि जो खरोखर योग्य उमेदवार आहे, त्याला निवडा. तुमच्या प्रत्येक मतावर ठाणे शहराचे भविष्य अवलंबून आहे. तुमचा मित्र, तुमचे कुटुंब अमुकअमुक उमेदवाराला मत देत आहेत, म्हणून तुम्हीही त्याच उमेदवाराला मत देऊ नका, तर पूर्णपणे विचार करून उमेदवाराची पार्श्वभूमी पाहून त्या उमेदवाराला मत द्या.