जितेंद्र कालेकरठाणे : लोकमान्यनगर भागात चोरट्यानी उच्छाद मांडला असून सोमवारी पहाटेच्या सुमारास घराची कडी उघडून घरातील लोकांवर गुंगीच्या औषधांची फवारणी करून त्यांच्या डोळ्यासमक्ष २० हजारांच्या रोकडसह अडिच लाखांचा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे मुख्य रस्त्यावरील सीसीटीव्हीमध्ये हा चोरटा कैद झाला असून त्याचा आता वर्तकनगर पोलीस कसून शोध घेत आहेत.लोकमान्यनगर पाडा क्रमांक चार मधील बाबूलाल शेट चाळीतील संदेश शेळके यांच्या घरात चोरट्याने पहाटे ३.३० ते ४.३० वाजण्याच्या सुमारास खिडकीतूनच लोखंडी अँगल टाकून दरवाजाची कडी उघडून शिरकाव केला. घरात शिरल्यानंतर त्याने संदेश यांची पत्नी प्रियंका (२३) आणि आई विमल (५०) यांच्यावर गुंगीच्या औषधाची स्प्रेने फवारणी केली. त्यामुळे शेळके कुटूंबियांना जाग येऊनही त्यांना काहीच हालचाली करता येत नव्हत्या. त्याने कपाटातील २० हजारांची रोकड, ४५ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र, ३५ हजारांचा सोन्याचा हार असा अडिच लाखांचा ऐवज लंपास केला. त्याने जातांना आणखी एका घरात चोरीचा प्रयत्न केला. तिथे मात्र, तो अयशस्वी झाल्यानंतर त्याने पलायन केले. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक पी. बी. यादव या अधिक तपास करीत आहेत................................बाळालाही थोपटले....हा चोरटा घरात शिरला त्यावेळी शेळके यांचा दीड वर्षांचा मुलगा अचानक रडू लागला. त्यावेळी त्याच्यातील माणूस जागा होऊन स्वत:ची सुरक्षितता म्हणून मुलाची आई किंवा आणखी कोणी उठू नये म्हणून त्याने मुलाला हळूवारपणे थोपटण्यास सुरुवात केली. इकडे मुलगा शांतपणे झोपला. त्यानंतर त्याने कोणी उठण्याच्या आतच आपले काम साध्य करुन पसार झाला. मात्र, गुंगीच्या औषधामुळे डोळ्याने हा सर्व पाहण्याखेरीज शेळके कुंटुंंब काहीच करू शकले नाही....................................चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैदही घटना घडल्यानंतर स्थानिक रहिवाशांसह वर्तकनगर पोलिसांनी आजूबाजूच्या सीसीटीव्हींची पडताळणी केली. त्यामध्ये हा चोरटा ज्या रस्त्यावरून तिथे आला. तो मार्ग, त्याचा चेहराही यात स्पष्टपणे दिसत आहे. मुख्य रस्त्यापासून आत येतांनाची त्याची सर्व छायाचित्रे यात आहेत. अनवाणी, चेहºयावर पावडर फासलेल्या अवस्थेत २५ ते ३० वयोगटातील या चोरट्याने जवळच असलेल्या मंदिरात दर्शन घेतल्याचेही या स्पष्टपणे दिसत आहे. आता या सीसीटीव्हीच्या आधारेही त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली..........................गस्त वाढविण्याची मागणीया घटनेनंतर मंगळवारी पहाटेही याच भागात पुन्हा चोरीचा प्रयत्न झाला. मात्र, सोमवारच्या घटनेनंतर जागृक झालेल्या नागरिकांनी आरडाओरड केल्यानंतर चारेट्यांनी पळ काढला. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे या भागात पहाटेच्या सुमारास पोलिसांनी फूट पेट्रोलिंग करावी, अशी मागणी येथील स्थानिक रहिवाशांनी केली आहे................बातमीला फोटो: १९ठाणे वर्तक सीसीटीव्ही चोरी
बाळ रडतांना पाहून चोरीसाठी आलेल्या चोरटयाने अवलंबला अनोखा मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 8:44 PM