लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) ३२२ पदांसाठी घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय मुख्य स्पर्धा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील सात पोलीस अंमलदारांचा समावेश आहे. थेट फौजदारपदी निवड झाल्याने या अंमलदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.एमपीएससीने २४ डिसेंबर २०१७ मध्ये उपनिरीक्षक पदासाठी पूर्व परीक्षा घेतली होती. या परीक्षेत राज्यभरातून चार हजार ५५९ उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले होते. त्यानंतर मैदानी चाचणीसाठी एक हजार ४५१ पोलीस अंमलदार पात्र ठरले होते. त्यांची मैदानी चाचणी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि अमरावती या ठिकाणी २४ फेब्रुवारी २०२० ते १५ जानेवारी २०२१ या दरम्यान घेण्यात आली. परीक्षेचा अंतिम निकाल १० फेब्रुवारी रोजी जाहीर झाला. यामध्ये ठाणे शहर पोलीस दलातील सात कर्मचारी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये कापूरबावडी पोलीस ठाण्यातील नितीन हांगे, बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यातील अमोल सूर्यवंशी, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यातील शिवाजी पाटील, शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील सागर सांगवे आणि बंकट्स्वामी दराडे तसेच पोलीस मुख्यालयातील इब्राहिम शेख आणि अंबादास सावंत या सात जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे कोणतीही सवलत न घेता पोलीस दलातील आपले कर्तव्य बजावून जिद्द, मेहनत, चिकाटीच्या जोरावर या अंमलदारांनी हे यश प्राप्त केल्याने पोलीस दलातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
ठाणे शहर पोलीस दलातील सात अंमलदारांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 8:10 PM
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) ३२२ पदांसाठी घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय मुख्य स्पर्धा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील सात पोलीस अंमलदारांचा समावेश आहे.
ठळक मुद्दे राज्य लोकसेवा आयोगाने घेतली परीक्षाराज्यभरातील ३२२ जणांचा समावेश