ठाणे : सामुहिक वन हक्क मिळालेल्या मुरबाड तालुक्यातील शिसेवाडी या गावाचा ‘आदर्श सामुहिक वन हक्क धारक गाव’ म्हणून राज्यस्तरीय पातळीवर गौरव करण्यात येणार आहे. जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्त साधून आदिवासी विकास विभागाव्दारे हा गौरव होणार आहे. ९ आॅगस्ट रोजी नागपूर येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.महाराष्ट्रातील गावांमधून क्षेत्रात आदिवासींसाठी सामुहिक दृष्ट्य उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गावांची या राज्यस्तरीय गौरवासाठी निवड केली जाते. यानुसार या शिरसेवाडीची ‘सामुहिक वन हक्क धारक गाव’ म्हणून निवड करण्यात आली आहे. या राज्यस्तीय कार्यक्रमामध्ये उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वने व आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती शिसेवाडी येथील गणपत मेंगाळ व नवसू वाघे यांना ग्रामसभेच्या वतीने गौरविण्यात येणार आहे.या गावातील ग्रामसभा वन निकेतन संस्था व श्रमिक मुक्ती संघटनेच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन वर्षांपासून आदिवासी गावकऱ्यांनी नियोजन पध्दतीने सामुहिक कार्य केले. या शिरसेवाडी गावकºयांनी सामुहिक वन क्षेत्राचा सूक्ष्म नियोजन पद्धतीने कृती आराखडा तयार करून वृक्ष लागवड केली आहे. जल व मृदा संधारण, वणवा प्रतिबंध तसेच गांव विकासाच्या योजना गावकरी राबवत आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर तसेच वन विभाग यांच्या सहकार्य या गावक-यांनी या सामुहिक कार्यात सहभाग घेऊन यश मिळवल्याचे वन निकेतन संस्थेच्या अॅड. इंदवी तुळपुळे यांनी सांगितले.या राज्यस्तरीय गौरवासाठी आदिवासी विकास विभागाला संस्थेचे जिल्हा समन्वयक कपिल कर्पे यांनी हा प्रस्ताव बिनचूक पाठवला होता. संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या नामांकानांमधून शिरसेवाडीच्या सामुहिक वन हक्क व्यवस्थापनाचे उत्कृष्ट कार्य म्हणून शिसेवाडीची निवड झाली आहे. यामुळे या गावक-यांचे अभिनंदन होत आहे. जंगलाचे राजे असलेल्यांच्या गौरव करून ख-या अर्थाने जागतिक आदिवासी दिन साजरा होईल,असे प्रतिपादनही वन निकेतनच्या इंदवी तुळपुळे यांनी केले आहे
राज्यस्तरीय ‘आदर्श सामुहीक वन हक्क धारक गांव’ च्या गौरवासाठी शिसेवाडीची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 6:42 PM
या राज्यस्तरीय गौरवासाठी आदिवासी विकास विभागाला संस्थेचे जिल्हा समन्वयक कपिल कर्पे यांनी हा प्रस्ताव बिनचूक पाठवला होता. संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या नामांकानांमधून शिरसेवाडीच्या सामुहिक वन हक्क व्यवस्थापनाचे उत्कृष्ट कार्य म्हणून शिसेवाडीची निवड झाली आहे. यामुळे या गावक-यांचे अभिनंदन होत आहे.
ठळक मुद्देआदिवासी विकास विभागाव्दारे हा गौरव नागपूर येथे हा कार्यक्रमजागतिक आदिवासी दिनाच्या निमित्त