शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
4
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
5
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
8
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
9
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
10
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
11
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
12
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
13
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
15
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
16
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
17
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
18
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
19
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?

दुबईतील अंतराळ परिषदेसाठी ठाण्यातील युवकांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2021 4:36 AM

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : संशोधनाची आवड असणाऱ्या विविध महाविद्यालयांतील ठाण्यातील तीन आणि दिल्लीतील एक अशा चार विद्यार्थ्यांची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : संशोधनाची आवड असणाऱ्या विविध महाविद्यालयांतील ठाण्यातील तीन आणि दिल्लीतील एक अशा चार विद्यार्थ्यांची दुबईत होणाऱ्या अंतराळ परिषदेसाठी एकमताने निवड झाली आहे.

इंटरनॅशनल अ‍ॅस्ट्रोनॉटिकल फेडरेशन (आयएएफ) या फ्रान्समधील पॅरिसस्थित एका अंतराळ अधिवक्ता गटातर्फे अंतराळ परिषद आयोजित केली आहे. यंदा दुबईमध्ये होणाऱ्या या परिषदेचे प्रतिनिधित्व करण्याचा मान भारतातील चार विद्यार्थ्यांना मिळाला आहे. त्यात ठाण्यातील अक्षत मोहिते, अभिजित कदम, निशांत राणे आणि दिल्लीतील शिवमकुमार सिंह हे चौघे विद्यार्थी ‘थ्रीडी प्रिंटेड रॉकेट काम्पोनंट आणि एअरजेलचे डिझाइन आणि औष्णिक विश्लेषण’ या विषयावर आपले दोन शोधनिबंध सादर करणार आहेत. त्यानंतर त्यांचा लेख औपचारिकरित्या आयएएफद्वारे प्रकाशित केला जाणार आहे.

शिवमकुमार हा स्पेसनोव्हा या कंपनीचा मुख्य संचालक असून ‘जगातील युवकांसाठी अंतराळ संशोधन’ या संकल्पनेचा तो जगभर प्रसार आणि प्रचार या युवकांच्या मदतीने करीत आहे. अक्षत हा ‘नासा’च्या विविध प्रकल्पांमध्ये कार्यरत आहे. संगीत क्षेत्रात स्वतःचे प्रभुत्व सिद्ध करणाऱ्या अनेक वाद्ये निपुण असणाऱ्या अभिजित स्पेसनोव्हा कंपनीचा मुख्य मार्केटिंग अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. स्पेसनोव्हा कंपनीच्या मुख्य आर्थिक संयोजक म्हणून निशांत राणे हा युवक यशस्वीपणे जबाबदारी सांभाळत आहे. आपल्या देशातील युवकांना अधिकाधिक विज्ञानवादी बनवून भारताचे नाव जगात उज्ज्वल करण्याचा मानस या तरुणांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, ज्या विभागातर्फे हा उपक्रम राबवला जातो, त्या विभागाला टीम स्पेसनोव्हा असे म्हणतात. अंतराळात करिअर करण्यास इच्छुक असलेल्या कोणालाही अंतराळ शिक्षण देणे हे टीम स्पेसनोव्हाचे ध्येय आहे, असे सांगण्यात आले.

-------------