लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कोरोनामुळे सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचा वापर कमी झाला आहे. सुरक्षितततेच्या दृष्टीने स्वत:ची दुचाकी किंवा चारचाकीतून प्रवास करण्याकडे सर्वांचा कल आहे. यामुळे दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री वाढली आहे. कल्याण आरटीओच्या नोंदणीनुसार २०२१ च्या पहिल्या ६ महिन्यांतच ७,११६ कारची नोंदणी झाली आहे. २०१९ या पूर्ण वर्षात ९,७५७ कारची नोंदणी झाली होती.
मुंबई आणि परिसरात जाण्यासाठी नागरिकांना रेल्वे बंद असल्याने अनेकांनी तातडीने कार बुक करून सुरक्षित प्रवास करण्यावर भर दिला. त्यामुळे पहिल्या सहा महिन्यांत या ठिकाणी कारची नोंदणी सर्वाधिक झाली. त्याखालोखाल दुचाकीची नोंदणी झाली आहे. २०१९ मध्ये ५६ हजार ९१९ दुचाकी, तर २०२१ जूनपर्यंत २२ हजार ४८४ दुचाकींची नोंदणी झाली आहे. या तुलनेत मात्र प्रवासी वाहनांची मागणी घटली आहे. रिक्षा, टॅक्सी, कार या वाहनांच्या नोंदणीत मोठी घट झाली आहे. मागणी नसल्याने कर्जाचे हप्ते कसे भरायचे, हा मोठा पेच व्यावसायिकांना असल्याने या वाहनांची मागणी कमी असल्याचे दिसून येत आहे.
-------------------
दुचाकी चारचाकी
२०१९ ५६,९१९ ९,७५७
२०२० ४३,८१८ ९,६९७
२०२१ २२,४८४ ३,३१२
-----------------
ऑटो, टॅक्सी, कारची विक्री घटली
ऑटो टॅक्सी कार
२०१९ ४,९९२ ७६५
२०२० १,८७४ ४५६
२०२१ ९४६ २३१