मीरा रोड : बनावट अकृषिक दाखल्यांच्या आधारे सदनिकांची विक्री करणाऱ्या देवेंद्र गोयल व त्याच्या दोन मुलांसह एकूण ५ विकासकांविरु द्ध भार्इंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे याच बनावट दाखल्यांच्या आधारे बांधकाम परवानगी घेण्यात आली होती. मीरा-भार्इंदरमध्ये बनावट एनए दाखल्यांचा वापर करून बांधकाम परवानग्या घेतल्या गेल्याचे आरोप नवीन नाहीत. अनधिकृत बांधकामे करण्यात आघाडीवर असणाऱ्या देवेंद्र गोयल व संबंधितांनी देवयोग बिल्डर्सच्या नावे मीरा रोडच्या नयानगर चौकाजवळील जुन्या सर्व्हे क्र मांक ५१५/२ मध्ये पालिकेकडून २००२ मध्ये बांधकाम परवानगी घेतली होती; परंतु सदर जमीन शांती पार्कमध्ये राहणारे नरेंद्रकुमार बलवानी यांनीदेखील विकासासाठी महेंद्र व निलेश पाटील यांच्याकडून घेतली होती. सदर जमिनीत पालिकेने बिल्डर गोयल याला बांधकाम परवनागी दिल्याने बलवानी यांनी त्याची माहिती घेतली. त्यात त्यांना बांधकाम परवानगीसाठी वापरलेला अकृषिक दाखला क्र मांक ६६२ बनावट असल्याचे निदर्शनास आले. प्रत्यक्षात सदर दाखल्याची माहिती मिळवली असता तो डोंबिवलीच्या गोखले मार्गावरील शिरीष माळकर यांच्या नावाचा व तेथील मौजे चौळे सर्व्हे क्र . २०८/८ आ या मालमत्तेचा असल्याचे उघड झाले. बलवानी यांच्या तक्र ारीनंतर तत्कालीन पालिका आयुक्त रामहरी दगडू शिंदे यांनी आॅगस्ट २००३ मध्ये गोयलसह सर्व संबंधितांची सुनावणी घेतली.
बनावट एनए दाखल्याच्या आधारे सदनिकांची विक्र ी
By admin | Published: January 25, 2016 2:43 AM