शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

मोदींच्या दौऱ्यावरुन सेना-भाजपात धुसफूस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 12:10 AM

.. तर आंदोलन करणार : सेनेचा इशारा

कल्याण : मेट्रो रेल्वे आणि पंतप्रधान आवास योजनेच्या घरांचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १८ डिसेंबर रोजी कल्याण पश्चिमेतील फडके मैदानावर होणार आहे. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर महापौर विनीता राणे यांना स्थान दिले नाही तर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा महापालिकेतील पक्षाचे गटनेते दशरथ घाडीगावकर यांनी दिला आहे.घाडीगावकर यांनी मेट्रो रेल्वे प्रकल्प हा एमएमआरडीएशी निगडीत असल्याने प्राधिकरणाला हे इशारा पत्र पाठवले आहे. या प्राधिकरणाचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याने, त्यानाही घाडीगावकरांनी पत्र पाठवले आहे. फडके मैदानाच्या स्वच्छतेपासून अन्य तयारीची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यासाठी पालिका कामाला लागली आहे.महापौर विनीता राणे या शहराच्या प्रथम नागरीक आहे. ज्या शहरात कार्यक्रम होतो, त्या शहरातील प्रथम नागरीकाला कार्यक्रमात मान असतो. राजकीय शिष्टाचारानुसार प्रत्येक कार्यक्रम पत्रिकेवर महापौरांचा उल्लेख असतो; मात्र मोदी यांच्या कार्यक्रम पत्रिकेवर महापौरांचे नाव नसल्याची माहिती शिवसेनाला मिळाली आहे. सरकारी कार्यक्रमातून महापौरांना डावलण्याचा डाव भाजपच्या पदाधिकाºयांचा असू शकतो. भाजपकडून शिवसेनेला दुय्यम वागणूक दिली जाते.या कार्यक्रमातही त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापौरांचा मान म्हणजे संपूर्ण शहराचा मान आहे. त्यांचा अवमान करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप घाडीगावकर यांनी केला. त्यामुळे पंतप्रधानांच्या व्यासपीठावर महापौरांना स्थान दिले नाही, तर शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा लेखी इशाराच घाडीगवकर यांनी दिला आहे.छावणीचे स्वरुपपंतप्रधानाच्या कार्यक्रमामुळे कल्याणला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. पोलिस सर्वत्र पाहणी करुन सुरक्षिततेची काळजी घेत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा कितपत खरा ठरतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.केवळ सत्तेसाठी एकत्रपालिकेत सेना-भाजपची सत्ता आहे. केवळ सत्तेसाठी एकत्र असलेल्या या मित्रपक्षांमध्ये मोदी दौºयावरुन पुन्हा एकदा धूसफूस सुरु आहे. कोणत्याही कार्यक्रमात हे पक्ष आपआपले अस्तित्व ठळकपणे दाखवण्याचा प्रयत्न करतात. यापूर्वी डोंबिवली माणकोली खाडी पुलाचे प्रातिनिधिक भूमिपूजन शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री येण्याच्या आदल्या दिवशीच उरकण्यात आले होते. असे प्रकार अनेकदा घडले आहेत. तत्कालीन आयुक्त पी. वेलरासू यांच्याविरोधात शिवसेनेने आंदोलन केले, तेव्हा भाजपा त्यात सहभागी नव्हती.हा कार्यक्रम पंतप्रधानांचा आहे. त्याचे नियोजन केंद्र व राज्य पातळीवर होते. त्यामुळे महापौरांना डावलण्यात आले की नाही, हे कार्यक्रमाची पत्रिका हाती येण्याआधीच कसे काय ठरविणार? कार्यक्रम पत्रिकेची माहितीच अद्याप प्राप्त झालेली नाही. शिवसेनेला एवढी घाई करण्याची गरजच का आहे?- वरुण पाटील, भाजपा गटनेते

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाShiv Senaशिवसेना