ठाणे - ठाणे- पालघरचे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या अटकेनंतर गेले काही दिवस सोशल मिडीयात शिवसेना आणि मनसेमध्ये चांगलाच वाद रंगला होता.मनसेचे समर्थन केले म्हणुन मारहाण करून एका तरूणाविरोधात शिवसैनिकांनी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल केला. मात्र,आता ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर वादविवाद टाळण्यासाठी तसेच, कोरोना आणि सणासुदीचे दडपण पोलिसांवर असल्याने या वादावर पडदा टाकल्याचे जाधव यांनी सांगितले. तसेच, उचलुन नेणे हा आमचा धंदा नाही,तर,ज्यांनी ज्यांनी आम्हाला त्रास दिला,त्यांना उद्देशून ते वक्तव्य केले होते.बाळासाहेबांच्या शिवसैनिकांबद्दल नितांत आदर आहे.असेही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.कोविड उपाययोजनेवरून सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासनाला धारेवर धरणाऱ्या मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केल्यानंतर शिवसेना ७ मनसेत चांगलेच वाक:युदध रंगले होते.सोशल मिडियातही या वादाला फोडणी मिळाल्याने प्रकरण हातघाईवर आले.त्यातच मनसेच्या समर्थनार्थ सोशल मिडीयात आक्षेपार्ह टीप्पणी करणाऱ्या मंगेश माने या तरूणाविरोधात गुन्हा दाखल झाला.या पाश्र्वभूमीवर सोमवारी अन्य एका प्रकरणाबाबत नौपाडा पोलीस ठाण्यात आलेल्या अविनाश जाधव यांनी वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल मांगले यांची भेट घेतली.तसेच,गणेशोत्सवात पोलिसांवरील ताण पाहता दोन्ही पक्षांकडून या वादावर पडदा टाकल्याचे सांगितले.जाधव यांनी भेट घेतल्याच्या वृत्ताला निरिक्षक मांगले यांनीही दुजोरा दिला.
ठाण्यात सेना-मनसे वादावर अखेर पडदा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 10:39 PM