शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

सेनेलाच ‘जय महाराष्ट्र’ करण्याचा इशारा!, कुणबी नेत्यांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 6:50 AM

भिवंडीच्या एकाच परिसराला तीन पदे दिली गेली, कल्याणमध्ये हातची सत्ता घालवली, शहापूरमध्ये राष्ट्रवादीला अकारण वाटेकरी बनवले या पद्धतीने काम केल्यास ज्या ठाण्याने शिवेसेनेला सत्तेची चव चाखायला दिली ते घरही हातचे जाईल. पक्षाची वाताहत होईल.

पडघा : भिवंडीच्या एकाच परिसराला तीन पदे दिली गेली, कल्याणमध्ये हातची सत्ता घालवली, शहापूरमध्ये राष्ट्रवादीला अकारण वाटेकरी बनवले या पद्धतीने काम केल्यास ज्या ठाण्याने शिवेसेनेला सत्तेची चव चाखायला दिली ते घरही हातचे जाईल. पक्षाची वाताहत होईल. कुणबी समाजाला डावलून इतर पक्षांना आमच्या डोक्यावर लादणार असाल; तर आम्ही राजीनामे देतो, अशा इशारा पडघ्यातील चिंतन बैठकीत कुणबी समाजातील शिवसेनेच्या नेत्यांनी दिला. तेव्हा वातावरण गंभीर बनले होते.शिवसेनेत एकीकडे मराठा आणि ग्रामीण भागात आगरी समाजाचे प्राबल्य वाढत असल्याने, जिल्हा परिषदेत घवघवीत यश मिळवून दिल्यानंतरही सभापतीपदे देताना कुणबी समाजाला डावलण्यात आल्याने संतापलेल्या त्या समाजातील शिवसेनेच्या नेत्यांनी आणि शिवसैनिकांनी गुरूवारी संध्याकाळी पडघ्यात चिंतन बैठक घेतली. भिवंडी, शहापूर आणि कल्याणमधील प्रतिनिधी या बैठकीला हजर होते. मुरबाड आणि अंबरनाथच्या प्रतिनिधींशी दोन दिवसात चर्चा केली जाणार आहे. ग्रामीणचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्यावर या प्रतिनिधींचा रोष असल्याने जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांनी कल्याणचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांगडे यांना बैठकीच्या ठिकाणी पाठवून संतप्त शिवसैनिकांचे म्हणणे समजून घेण्यासाठी पाठवले. प्रत्यक्ष बैठकीत बोलणाºया प्रतिनिधींनी प्रकाश पाटील नव्हे, तर एकनाथ शिंदे यांनाच लक्ष्य करत जिल्ह्याकडे, तेथील सामाजिक समतोलाकडे लक्ष देण्याचा इशारा दिला.शिवसेनेचे भिवंडी, शहापूर व कल्याणचे संपर्कप्रमुख विष्णू चंदे व कल्याण तालुकाप्रमुख वसंत लोणे यांनी आयोजित केलेल्या या शिवसेनेच्या कुणबी चिंतन शिबिरात समाजातील शिवसैनिकांकडून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिनिधी म्हणून आलेले कल्याणचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे व शहापूरचे तालुकाप्रमुख मारु ती धिरडे यांच्यासमोर तिखट प्रतिक्रि या व्यक्त करण्यात आल्या. आजवर झालेल्या अन्यायाचा पाढाही वाचला. यावेळी कल्याण ग्रामीणच्या कमिटीने तसेच विष्णू चंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवल्याने लांडगे यांनी त्यांना शांत राहण्याचे आवाहन करून पुन्हा एकदा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून मगच निर्णय घ्यावा, असे सुचवले. कल्याण तालुका विधी समितीचे अध्यक्ष अल्पेश भोईर यांनी कल्याण पंचायत समितीची सत्ता हातातून गेल्याने किमान जिल्हा परिषदेचे सभापतीपद मिळावे, यासाठी जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्यासमोर कैफियत मांडली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला.शिंदेच्या घरावर मोर्चाचा इशाराकुणबी समाजाविरोधात काम करणारे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर मोर्चा काढावा. समाजावर असाच अन्याय होणार असेल, तर याचे परिणाम आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला भोगावे लागतील, असा इशारा अंबाडीचे विभागप्रमुख संजय पाटील यांनी दिला.भिवंडी महापालिकेतही स्वीकृत सदस्य निवडीदरम्यान मला डावलल्याचे उपशहरप्रमुख मनोज गगे यांनी सांगितले. विभागवार पदे देणे गरजेचे असतानाही एका ठराविक विभागातच पदे दिल्याची नाराजी विभागप्रमुख के. बी. विशे यांनी व्यक्त केली.लोणे यांचा बांध फुटलाया बैठकीदरम्यान भाषण करताना कल्याणचे तालुकाप्रमुख वसंत लोणे भावूक झाले आणि भाषणादरम्यान त्यांना रडू आवरता आले नाही. समाजावर नेहमीच अन्याय होत असल्याचे विष्णू चंदे यांनी सांगितले.अखेर लांडगे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सकारात्मक निर्णय घेतला जाणार असल्याचे आश्वासन दिले. तुमच्या भावना शिंदे यांच्या कानावर घातल्या जातील आणि त्यांच्याशी भेट घडवून आणली जाईल, असेही त्यांनी सांगितले.बैठकीनंतर काही काळ थांबून लांडगे यांनी उपस्थित नेत्यांची समजूत काढली. काही जणांना फोन करून वातावरण कसे निवळेल, यासाठी प्रयत्न केले.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाthaneठाणे